शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क :-
शिर्डी शहरातील काही नागरीकांनी काल समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकली.. त्यांना धर्मांतरा शिवाय पर्याय नाही.. भारत स्वतंत्र झाला.. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील तमाम दलितांना मुख्य प्रवाहात आणले..!
*भारतात अस्पृश्यता हि मोठी किड होती.. चातुरवर्णीय संस्कृती प्रमाणे दलितांनी फक्त नोकर- चाकर म्हणून जन्माला यायचे व नोकर चाकर म्हणून च मरायचे.. दलितांना स्वावलंबाने जगण्याचा हक्क नव्हता..! आज घटनेने दलितांना संरक्षण मिळाले.. पण खरच आमची मानसिकता बदलली काय? आत्मपरीक्षण करण्याची खरी वेळ आली आहे*
दोन महिन्या पूर्वी मी साईमंदिरात हार फुले चालू करावी म्हणून तीन सत्याग्रह केले....; सत्याग्रहाचे वेळेस अहमदनगर चे भारतीय जनता पक्षाचे खासदार हार फुले चालू करावे म्हणून माध्यमातून समोर ओरडले.... आकांडतांडव केले.
*भारतीय जनता पक्षाचे मंत्री यांनी तात्काळ शिर्डीला बैठक लावली.. संस्थानला काही हरकत नव्हती.. पण पोलीस व सवर्ण गावकरी एकत्र आले.. आणि फुल व्यवसायात गुन्हेगार असल्याचे सांगून मंत्री व सवर्ण गावकरी यांनी मिळून हार फुले चालू करण्यासाठी त्रिसदस्य समिती एक महिन्यात निर्णय घेईल असे अश्वासन दिले*
विशेष बाब म्हणजे एका सवर्ण ग्रामस्थाने मला सांगितले होते की फुल व्यवसायावर दलितांचे वर्चस्व असल्यामुळे शिर्डीत फुल व्यवसाय बंदच रहावा..
सदर कालच्या समाजमाध्यमांवर सुटलेली पोस्ट स्पष्ट करते कि शिर्डी शहरात फुल व्यवसायाचे निमित्ताने छुप्या पध्दतीने .. शासनाच्या मदतीने अस्पृश्यता प्रथेला खतपाणी घातले जात आहे.. हि बाब धोकादायक आहे..?
जर शिर्डीमध्ये हार फुलांच्या व्यवसायात गुन्हेगार आहेत तर ते शोधून त्या गुन्हेगारांचा बिमोड करण्यापासून पोलीसांना आजवर कुणी रोखले.. ? पोलिसांचे अधिकार पोलिसांना नाहीत काय...? एखादा वाड्यावर हजेरीस न जाणारा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शासनाने त्वरित नेमावा...
देशातील अस्पृश्यतेची प्रथा मोडून काढण्यासाठी समाज सुधारकांना अथक परिश्रम घ्यावे लागले.. साईबाबांचे हायातीत त्यांना जातीयवाद कधीच मान्य नव्हता.... त्यासाठी "सबका मालिक एक है " सगळ्यांचा देव एकच आहे.." "सर्व धर्म समभाव हि त्यांची शिकवण" त्यांच्या विचारांना बाजूला ठेवून त्यांच्याच पवित्र भुमी मध्ये काही कुटुंब अत्याचारांना कंटाळून धर्मांतराची भाषा जर करीत असतील तर हे शासनाचे व प्रशासनाचे अपयश आहे.
भारतीय जनता पक्षाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मतदार संघात ही घटना निंदनीय आहे.. माझ्या कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना साईबाबांचे चरणी अर्पण करण्यासाठी त्यांनीच नेमलेल्या त्रीसदस्य समिती चा निर्णय जाहिर करावा..
महाराष्ट्र शासनाने ज्या नागरिकांनी धर्मांतराचा मार्ग जाहीर केला त्यांच्या व्यथेची चौकशी करुन त्यांना धर्मांतरा पासून रोखण्यासाठी काय पाऊल उचलले ते जाहिर करावे..
माझे शिर्डीतील सर्व नेत्यांना विनम्र आवाहन आहे जातीयवाद सोडाच सोडा.. , साईबाबांचे मुळ विचारांना जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवा...
साईबाबांचे शिर्डीत यापुढे साईबाबांचे विचारांची पायमल्ली करु नका...!
सामाजिक कार्यकर्ते
संजय भास्करराव काळे
कोपरगाव.