shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी गावची सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान.

वडापुरी गावची सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान.
 मिलेटच्या कामाला मिळाली राजमान्यता, सन्मान चिन्ह, रोख बक्षीस एक लाख देऊन सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचे
अहमदनरजवळील राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांचा भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणुन राज्य पातळीवर निवड झाली होती त्यासंदर्भात आज  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते सन्मान चिन्ह, रोख बक्षीस एक लाख असा त्यांचा सन्मान करण्यात आला.
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८ जाहीर करण्यात आले. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामधे स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरीता पूरक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता इनक्युबेटर्सची स्थापना, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
 
नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात, त्या कुठेही यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी शासनामार्फत दि. १५ ऑगस्ट २०२२ ते दि. १७ सेप्टेंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

या यात्रेची वैशिषटये म्हणजे
महाराष्ट्राच्या तळागाळातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेवून त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,
नवसंकल्पनांना तसेच सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे,
राज्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे अशी आहेत.

या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या तळागाळातील अनेक जणांनी आपल्या कल्पना मांडल्या, यातून राज्यस्थरावर वेगवेगळ्या विभागातून २१ जणाची विजेते म्हणुन निवड करण्यात आली.
त्यात अहमदनरजवळील राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांचा भरडधान्यातील उत्कृष्ठ महिला उद्योजिका म्हणुन राज्य पातळीवर निवड करण्यात आली . 
सरोजिनी फडतरे व तात्यासाहेब फडतरे यांनी देवळाली प्रवरा आणि इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे २०१२ पासून ज्वारी बाजरी आणि नाचणी यांचे लागवडी पासून ते प्रक्रिया उद्योग सुरु करुन पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मॉडर्न पद्धतीने झटपट खाण्यासाठी ज्वारी बाजरी आणि नाचणी यांचे पदार्थ तयार केले आहेत. आज त्यांच्या एकूण ३०२ शेतकरी जोडलेले असून त्यातील २९ शेतकरी सेंद्रिय शेती करत जोडलेले आहेत. आज 
यासाठी त्यांना आज सन्मान चिन्ह, रोख बक्षीस एक लाख असा सत्कार महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते  समाजासाठी उत्तम भरडधान्य पदार्थ म्हणून सर्वोत्कृष्ट महिला हा पुरस्कार देण्यात आला.
close