shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.मोहसिन शेख यांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी नाविन्य व कल्पकता वापरून महसूल खात्यात प्रथमच आणले क्यूआर कोड..!

महसुली अर्धन्यायीक "क्युआरकोड" द्वारे घरबसल्या मिळणार..!

अहमदनगर । प्रतिनिधी :-
शासकीय सेवेत काम करीत असताना अनेक अधिकारी प्रशासनात सुशासन व लोकाभिमुख प्रशासकीय नाविन्य पूर्ण प्रयोग करताना आढळतात.., राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी प्रशासन गतिमान होण्यासाठी महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायिक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड' च्या माध्यमातून देण्याचा  नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. 


     डॉ.मोहसिन शेख, मंडळ अधिकारी


मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी तंत्रज्ञानाचा कल्पक संकल्पना प्रत्यक्षात उतरविली असून हा अर्धन्यायिक कामकाज प्रक्रिया मधील महाराष्ट्र किंवा देशातील पहिलाच प्रयोग आहे.सर्व सामान्य जनता विशेषत: शेतकरी खातेदारांबरोबरच अर्धन्यायिक स्वरुपाचे कामकाज पाहणारे महसूल अधिकारी,कर्मचारी व  विधिज्ञ यांच्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. 

शासकीय कामात अधिक पारदर्शकता व तत्परता ‘क्यूआर कोड' निर्णयामुळे येणार असून नागरिकांना घरबसल्या निकालपत्रक मिळणार आहे. अशी कार्यपध्दती डॉ.मोहसिन शेख पॅटर्न म्हणून राज्यासाठी राबवण्याची गरज आहे.

ही कार्यप्रणाली अमलात आणल्यामुळे डाॅ.मोहसीन‌ शेख यांचे महसुल विभाग कडून सेवानिवृत्त महसूल उपायुक्त प्रल्हाद कचरे, अहमदनगर जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भोसले, मुंबई चे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी डाॅ. संजय कुटेकर, राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच महसुलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचेकडून व सर्वच स्तरातून डाॅ.शेख यांचेवर अभिनंदन व कौतूकाचा वर्षाव होत आहे.
close