कोपरगाव - सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रगत वैज्ञानिक दृष्टिकोनी दुरदृष्टीतून व त्यागाने
साकारलेल्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या विज्ञान तीर्थक्षेत्री मागास वंचित ग्रामीण जनतेत जीवनोन्नती विज्ञान बाल वैज्ञानिकांत रुजविण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सायन्स एक्स्पोतून सुवर्ण संधी
संस्था कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल संचालिका सौ. मनाली कोल्हे यांनी उपलब्ध करून दिली.
या एक्स्पोत पाचवी ते सातवी वर्गातील बालवैज्ञानिकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या अभ्यासू कसोटीतून स्वतःचे सुप्त गुणांना जागृत करून 45 नवनिर्मित स्वतः बनवलेली उपकरणे प्रात्यक्षिकातून उपस्थित मान्यवर व प्रेक्षकांची वाहवा मिळवली .
या एक्स्पोत अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित थीप कॅचर ,ऑब्स्टॅकल अव्हाईडींग कार रोबोट, रेड्युस रिसायकल ॲण्ड इंडिकेटर , हायड्रोपोनिक्स फार्मिंग , डे टू डे सायन्स आणि ग्लोबल वार्मिंग या वैशिष्ट्यपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या उपकरणांनी विविध प्रकारची बक्षिसे पटकावली.
या एक्स्पोत परीक्षक म्हणून डॉ. राकेश भल्ला , डॉ.कुणाल कोठारी , डॉ. प्रियांका कोठारी, आदींनी काम पाहिले.शेवटी प्राचार्या शैला झुंजारराव आभार मानले.