shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"भोसरी, येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेतील शिक्षक स्टाफ, आणि संचालकांची जागतिक कीर्तीची वाबळेवाडी शाळा, आणि कनेरसर येथील जालिंदर नगर शाळेस भेट!"

*भेटीमध्ये घेतली शाळेतील विविध उपक्रमांची माहिती..!

 *शाळेतील मुलांची, शिक्षकांशी, ग्रामस्थांशी, साधला सुसंवाद!
   
*राष्ट्रपती पारितोषिक विजेते, आणि वाबळेवाडी शाळेचे प्रणेते व सध्या जालिंदर नगर शाळेत कार्यरत मा. श्री. दत्तात्रेय वारे सरांची घेतली सखोल मुलाखत..!

*कनेरसर येथील दत्तात्रेयवारे सरांचे शाळा विकासाचे व विद्यार्थी विकासाचे काम पाहून झाले सर्वजण प्रभावित..!

*नारायण हटशिक्षण संस्थेच्या शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदर्श शिक्षक व राष्ट्रपती पारितोषिक विजेते मा. दत्तात्रय वारे सर यांनी दिले आश्वासन..!


भोसरी । प्रतिनिधी : शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी४:०० असा दिवसभर शाळा भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला.

      नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत नाविन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे, विद्यार्थी सर्वांगीण विकासाचे वेगवेगळे उपक्रम समजावे, चांगल्या शाळांकडून प्रेरणा घ्यावी, विविध शाळातील नाविन्य उपक्रम समजावे, भेटीमधून अनुभवास आलेले चांगले/वेगळे उपक्रम आपल्या शाळेत राबवावे या हेतूने या शाळा भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यातआले होते.
         या शाळा भेट कार्यक्रमात सुरुवातीला वाबळेवाडीता. शिरूर जि. पुणे. शाळेसभेट देऊन तेथील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक विद्यार्थी, यांच्याशी चर्चा करण्यात आली, तेथील उपक्रमाविषयी माहिती घेण्यात आली,शाळेचा परिसर व क्रीडांगण इतर मूलभूत सुविधांविषयी माहिती घेण्यात आली.

        दुपारी १:०० वाजता वाबळेवाडी शाळेचे प्रणिते व सध्या कनेरसर येथील शाळेत कार्यरत असणारे आदर्श शिक्षक राष्ट्रपती पारितोषिक विजेतेमा. श्री. दत्तात्रय वारे यांच्या सध्याच्या कनेरसर-जालिंदर नगर ता. खेड जि.पुणे. येथील शाळेत भेट देण्यात आली.
       या शाळेमध्ये परिसर पाहणे, भौतिकसुविधा, इमारत रचना, वर्ग व्यवस्था, अध्यापन साहित्य व्यवस्था, अध्यापनाची पद्धती, शालेय दैनंदिन उपक्रम, अभ्यास इतर उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, याविषयीची सर्वांगीण माहिती या भेटीमध्ये  मिळविण्यात आली.
       कनेरसर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून सर्वजण भारावून गेले. विद्यार्थ्यांचा बौद्धिक दर्जा अतिशय उत्तम असून विद्यार्थी उत्तम पद्धतीने इंग्रजी, जपानी, हिंदी, मराठी, भाषामध्ये संवाद साधतात हे प्रत्यक्ष अनुभवास मिळाले .
         मा. श्री. दत्तात्रय वारे सरांची मुलाखत घेताना व चर्चा करताना त्यांनी शाळेचे उभारणी कशी केली, विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून कशा पद्धतीने अध्यापन करायचे, शाळेतील नाविन्यपूर्ण गोष्टी, भविष्यातील नियोजन, अतिशय सखोल चर्चा केली व मार्गदर्शन केले.
    आदरणीय दत्तात्रय वारे सरांनी शिक्षकांना व संचालकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले "विद्यार्थी हे दैवत मानून विशिष्ट हेतूनेप्रेरित होऊन त्या दृष्टीने वाटचाल केली तर शाळेचा विकास होण्यास वेळ लागत नाही" 
कनेरसर येथील शाळा भेट कार्यक्रमांमध्ये सहशिक्षक मा. श्री. संदीप म्हसुडगे, ग्रामपंचायत सदस्य मा. चांगदेव झोडगे (ग्रामपंचायत सदस्य) यांचे मार्गदर्शन लाभले.
     शाळा भेट कार्यक्रमांमध्ये नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ‌ उज्वला थिटे, प्राचार्या- विजया चौगुले, मालती माने,प्रतिभा तांबे,  सायली संत, सुरेखाताई मुके, श्री प्रवीण भाकड यांनीसहभाग घेतला
       नारायण हट शिक्षण संस्थेची शाळा दर्जेदार शिक्षणाचे केंद्र बनावे यासाठी वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या जातात. आत्तापर्यंत ज्ञान प्रबोधनी शाळा निगडी, अभंग इंग्लिश मीडियम स्कूल देहू, या शाळांना अशाप्रकारे भेटी दिल्या आहेत. शाळा भेटींमधून अनुभवास आलेलेचांगले उपक्रम संस्थेच्या शाळेमध्ये राबवण्याचा ध्यास संस्थेच्या सर्व संचालकांनी घेतला आहे.
close