विदर्भातील सर्व जिल्ह्यात आजपासून पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने आज विदर्भासाठी यलो ॲलर्ट जारी केला आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज 15 ऑक्टोबर पासून राज्यात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते राज्यात शिर्डी, छत्रपती संभाजी महाराज नगर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, राहुरी, कोकण, देवगड, कोल्हापूर, जालना, परभणी, पैठण, पुणे, खामगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, सांगली, इचलकरंजी, अकलूज, सोलापूर, मुंबई, कल्याण, गोरेगाव, अहमदनगर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मित्रांनो पंजाबराव यांनी अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.मात्र शिर्डी आणि राहुरी या दोन ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज या वेळी पंजाबराव यांनी दिला आहे.