shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उड्डाणपुुलाच्या पिलरचे विद्रुपिकरण भोवले ; गुन्हा दाखल होणार..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२

उड्डाणपुुलाच्या पिलरचे विद्रुपिकरण भोवले ; गुन्हा दाखल होणार..!!
 
अहमदनगर : नगर शहराच्या वैभवात भर घालणार्‍या उड्डाणपुुुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होत असतानाच पुलाच्या सर्व पिलरवर (खांब) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारीत चित्र साकारली जात आहे. हे काम देखील आता बर्‍यापैकी गती घेत असतानाच एका खासगी शिक्षण संस्थेने त्यांच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाची माहिती देणारी पोस्टर रंगकाम झालेल्या पिलरवर चिकटवली. विनापरवानगी लावण्यात आलेले हे पोस्टर काढण्याचे आदेश आल्यानंतर बांधकाम विभागाकडून ती काढली. मात्र, त्यामुळे रंगकामाचे विद्रुपीकरण झाले. याची माहिती मिळताच खासदार डॉ. सुजय विखे पाटील संतप्त झाले आणि त्यांनी संबंधीत संस्थेच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर शहरात उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून या कामावर आणि त्याच्या गुणवत्तेवर खासदार डॉ. सुजय विखे पाटलांसह आमदार संग्राम जगताप हे लक्ष ठेवून आहेत. या कामाच्या दैनंदिन प्रगतीचा आढावा स्वत: विखे पाटील हे घेत असतात. दिल्लीत असले तरी ते रोज यंत्रणेच्या संपर्कात असतात. उडाणपुलाच्या पिलरवर (खांबांवर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत ऐतिहासीक देखावा सादर करणारी अतिशय रेखीव भित्तीचित्रे रेखाटली जात आहेत. पुलाखालून प्रवास करताना महाराजांचा पराक्रम आणि त्यांनी केलेली कामगीरी यानिमित्ताने दिसणार आहे.

पुलाच्या याच खांबांवर अतिशय रेखीव अशी चित्रे साकारत असताना त्यावर शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेने (पॅरामेडीकल अभ्यासक्रम) काही पोस्टर चिटकवली. यासाठीची कोणतीही परवानगी या संस्थेने घेतली नाही. या पोस्टरमुळे ऐतिहासीक चित्रांचे विद्रुपीकरण झाले असल्याचे लक्षात येताच ती काढण्यात आली. मात्र, असे करताना या चित्रांचे रंगकाम देखील निघाले. त्यामुळे विद्रुपिकरण झाले.

सदरची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी समजताच त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली. नगरच्या वैभवात भर घालणारे काम होत असताना त्याचे असे विद्रुपिकरण होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विखे पाटलांनी दिलेत. त्यामुळे यापुढे सदर कामावर कोणीही असे विद्रुपिकरण करण्याचे धाडस दाखवणार नसल्याची चर्चा नगरकरांमध्ये झडत आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 


close