shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तलवारीचे ३६ वार अंगावर घेत बिरोबाभक्ताने सांगितली आगामी वर्षातील 'ही' भविष्य वाणी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२

तलवारीचे ३६ वार अंगावर घेत बिरोबाभक्ताने सांगितली आगामी वर्षातील 'ही' भविष्य वाणी..!!

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मीरी ता. पाथर्डी येथील बिरोबाभक्त सिताराम बाळाजी भगत यांनी भंडाऱ्याची उधळण करत स्वतःच्या उघड्या अंगावर तलवारीचे छत्तिस वार झेलत आगामी वर्षाची भविष्यवाणी सांगितली.

ती पुढील प्रमाणे-
दिवाळीचा दिवा साजरा होईल म्हणजे दिवाळीला पाउस येईल. गोंदण भरण, लक्ष्मीला पिडा होईल, म्हणजे शेळ्या, मेंढ्या आजाराने मरतील, कैक हसतेस, कैक रडतेन, सटीच सटवण, कुठे कुठे चळण फिरण म्हणजे चंपाषष्ठीला काही ठरावीक ठिकाणीच पाउस पडेल. बांदाशेजारी बांद, कैक हसतेन कैक रडतेन म्हणजे काही शेतकऱ्यांची शेती पिकेल आणि शेजारच्या शेतकऱ्याची बांदाजवळील शेती नापिक राहील, नउ लाख बांगडी फुटण, म्हणजे महिला वरील अत्याचारात वाढ होईल. रक्ताचा पूर वाहिन, अपघातात अनेकजण मरतील आणि रस्त्यावर रक्ताचा पूर वाहीन. दुग्धर येतील झोकारे खातील, पांढऱ्याच सोन होईल, म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तू महाग होतील, कापसाला जास्त प्रमाणात भाव येईल. गहु हरबरे जोडीन पिकतीन सवाईने विकतील,गहू आणि हरबऱ्याच्या पिकाला झडती राहील, जास्त दराने विकतील. वादळ होईल, मायेच लेकरू पारख होईल,म्हणजे वादळात अनेक जण म्रुत्युमुखी पडून लहान बालकांला आई राहणार नाही. बारा कोसावर दिवा लागण, पिडा वाहीन, जठूड साधन, म्हणजे खरीप हंगामातील बाजरी सह सर्व पिके येतील.ढगफुटी होईल, महापूर येईल, आखाडी पडन म्हणजे आषाढ महिन्यात पाउस पडणार नाही.हत्यारे होइल,गादीची छाया होईल सत्तेसाठी राजकीय नेते एकमेकांना संपवन्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करतील.अशा प्रकारे सांकेतिक भाषेत भविष्य वाणी वर्तविण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी (भविष्यवाणी) होईक ऐकण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती.

मंदिरातील सेवक आसाराम भगत, जबाजी निर्मळ, भानुदास भगत, आबू भगत, दत्तात्रय भगत, भाउसाहेब तोगे, विश्वनाथ तोगे, गोरक्ष तोगे, बंडू तोगे, दशरथ भगत, लक्ष्मण भगत, विष्णु सोलाट, महेंद्र सोलाट, लक्ष्मण सोलाट, अशोक शिपनकर यांनी सहकार्य केले.

शिर्डीचे प्रसिद्ध उद्योजक रतीलाल लोढा काका यांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महेश लोढा यांनी बिरोबा मंदिरात जाउन महानैवेद्य अर्पण करत दर्शन घेतले. माजी सरपंच संतोष शिंदे,त्यांच्या नंतर चारूदत्त वाघ यांनी ही मंदिरास भेट देउन हजेरी लावली.यात्रा कमेटीच्या वतीने कुस्त्यांचा भव्य जंगी हंगामा भरवण्यात आला होता. पै.शिपनकर यांनी अनेक मल्लांच्या कुस्त्यांत पंच म्हणून काम पाहिले. सर्व तोलामोलाचे नेते मंडळी जंगी हंगाम्यात उपस्थित होते.यात्रेतील रस्त्यावरील दुकानामुळे रहदारी ठप्प झाली होती. दुपार नंतर महिलांनी जास्त प्रमाणात गर्दी केली होती.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 

close