जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी कौठळी शाळेत डॉ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन व हात धुवा दिन साजरा करण्यात आला.प्रथम डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी सरांनी केले.नंतर उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी डॉ अब्दुल कलाम यांचे कार्य सांगून वाचनाचे महत्व सांगितले.मुलांनी देखील आज गोष्टींची पुस्तके, वर्तमानपत्र,क्रमिक पुस्तकांचे वाचन केले.
भारत ननवरे सरांनी मुलांना हात धुण्याचे महत्व सांगून हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
आज वृत्तपत्र विक्रेता दिन याबाबत नंदकुमार सूर्यवंशी सरांनी माहिती दिली व मुलांनी देखील पुढारी,सकाळ अशा वृत्तपत्रांचे वाचन केले.