शौकतभाई शेख श्रीरामपूर
श्रीरामपुर तालुका केमिस्ट अँंड ड्रगीस्ट असोसिएशनच्या संचालकपदी बेलापुर येथील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे लिंक फार्माचे कैलास चायल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यातील बेलापुर येथील साई इंग्लीश मिडीयम स्कूलचे चेअरमन,बेलापुर साई मंदिराचे अध्यक्ष व लिंक फार्माचे कैलास चायल यांची सन २०२२- २५ या वर्षाकरीता निवड करण्यात आली आहे.
श्रीरामपुर तालुका केमिस्ट अँंड ड्रगीस्ट असोसिएशनच्या
संचालक मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती त्यात श्रीरामपुर शहरातुन बारा व ग्रामिण भागातुन तीन अशा पंधरा संचालकांची निवड करण्यात आली असुन सर्वांच्या सर्वं पंधरा संचालकांची निवड ही बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे श्रीरामपुर तालुका केमिस्ट अँंड ड्रगीस्ट असोसिएशनच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
आयोध्येत निर्माण होत असलेल्या श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांचे बेलापुरात आगमन झाले असता चायल यांनी स्वामी गोवींददेवगीरीजी महाराजांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.
या वेळी स्वामींनी चायल यांना आशिर्वाद दिले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या,यात ग्रामीण भागातुन बेलापुर येथील कैलास चायल,टाकळीभान येथील अथर्व टुपके तर दत्तनगर येथील सुजीत राऊत यांचा बिनविरोध संचालकात समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज राठी यांंनी काम पाहीले.