महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती इंदापूरच्या वतीने आज सहाय्यक निबंधक यांच्याकडे पतसंस्थेच्या संचालक मंडळाने दिलेल्या कर्जाबाबत तक्रारी अर्ज दाखल.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संचालक यांना सर्व सभासदांना सरसकट तीस लाख कर्ज वाटप करावे. कर्ज घेते वेळी ज्या अटी शर्ती घातल्या आहेत त्या शिथिल कराव्यात व इतर मागण्या संदर्भात इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक समितीच्या शिक्षकाकडून विद्यमान पतसंस्थेचे संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षक समितीच्या आक्षेपा संदर्भात दिनांक २२ ऑक्टोबर रोजी पतसंस्थेचे चेअरमन यांनी याबाबत खुलासात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु दिनांक २८ ऑक्टोबर रोजी शिक्षक समितीचे धरणे आंदोलन झाले. तसेच सहाय्यक निबंध इंदापूर यांच्याकडे इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने दिलेल्या नियमबाह्य मोठे कर्जा बाबत विनंती तक्रारी अर्जाची निवेदन दाखल केले आहे. यावेळी अध्यक्ष ज्ञानदेव बागल, उपाध्यक्ष नजीर शिकिलकर,हरीष काळेल, सुनिल वाघ, नितीन वाघमोडे,किरण म्हेत्रे, संभाजी काळे, ज्ञानदेव चव्हाण,शफीक शेख, अरुण मिरगणे,संतोष हैगडे,भारत ननावरे,प्रताप शिरसट व इतर उपस्थित होते.
सदर निवेदन व विनंती तक्रारी अर्ज बाबत सहाय्यक निबंध इंदापूर यांना याबाबत विचारले असता सदर बाबींचा संबंधित संस्था पदाधिकारी यांच्याकडून सविस्तर मत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.