shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे या मंडळाच्या वतीने जेष्ठ साहित्यिक टि.एस.चव्हाण यांचे विनम्र आवाहन..!

पुणे । प्रतिनिधी :-

साहित्य मंडळ पुणे महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने देश स्तरावर वडार समाजाचे दुसरे स्वतंत्र साहित्य संमेलन दि. ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजन केले आहे. वडार समाज व भटक्या विमुक्त समाजातील साहित्यीक, कवी, लेखकांना एक स्वतंत्र विचारपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल वडार बोली साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य ही संस्था कार्यरत असून सालाबाद प्रमाणे या ही वर्षी साहित्य संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे.

         टि.एस.चव्हाण,जेेेष्ठ साहित्यिक

साहित्यीकांचे विचार पाला, तांड्यावर, वाडी, वस्तीवर पोहोचावे तसेच फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करुया.. ; 
        
या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपले प्रश्न, समस्याला उजागर करावयाचे आहे. या वैचारिक मंथनातून एक मार्ग नक्कीच मिळेल असे अपेक्षीत आहे. जेणे करून या प्रश्नांकडे माध्यमांनी दखल घ्यावे हा हेतू आहे. शासनाने सुध्दा या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. म्हणून साहित्य संमेलनातून आपल्या प्रश्नांना वाचा फोडूया.. साहित्यामुळे
समाजाला दिशा मिळते, मान, सन्मान प्राप्त होते, स्वाभिमानाने जगण्यासाठी बळ मिळते. म्हणूनच साहित्याला समाजाचा आरसा म्हटले जाते. ज्या समाजात साहित्य नाही तो समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. या साहित्य संमेलनामुळे
आंबेडकर विचारांची प्रेरणा होऊ शकते, म्हणून साहित्य संमेलन भरविणे ही काळाची गरज आहे, तसेच समाजाला साहित्याचे महत्व कळावे. साहित्यामुळे समाजात जनजागृती व्हावी व समाजाचे प्रबोधन हया उदात हेतुने सदर साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. 

तरी विनम्र आवाहन करण्यात येते की, सदर साहित्य संमेलनाचे महत्व ओळखून आपण सर्वांनी या भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी व्हावे व तसेच आर्थिक
मदतीचा हात पुढे करावे अशी सर्वांना विनंती करतो.

जेष्ठ साहित्यिक 
श्री टि. एस.चव्हाण
अध्यक्ष-अखिल वडार बोली साहित्य मंडळ, पुणे.
close