shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक : भारती राजू सोडनर या विवाहितेचे शेताजवळील विहिरीमध्ये आढळले प्रेत..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                        शुक्रवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२२

भारती राजू सोडनर या विवाहितेचे शेताजवळील विहिरीमध्ये आढळले प्रेत, घातपात झाल्याचा नातेवाईकांना संशय..!!


राहुरी :  तालुक्यातील पिंप्री अपघड मध्ये गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या भारती राजू सोडनर वय 24 वर्षे या विवाहित तरुणीचा मृतदेह त्यांच्याच शेताजवळ असलेल्या विहिरीमध्ये आज दुपारी ठिक 12:30 वाजताआढळून आला आहे .

          ही विवाहित तरुणी गेल्या तीन दिवसांपूर्वी घरातील वादामुळे पहाटे रागाने घराबाहेर पडली होती .शेता जवळील विहिरीच्या ठिकाणी तिची ओढणी आढळून आल्याने या विहिरीततिचा घातपात किंवा आत्महत्या झाल्याचा नातेवाईकांना संशय आल्याने या विहिरीत व इतर ठिकाणी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू होता .पाण्याने पूर्ण भरलेले विहिरीमध्ये नातेवाईकांनी इलेक्ट्रिक मोटर सोडून पाणी उपसा केला असता आज तिचा मृतदेह त्या विहिरीमध्ये आढळून आला आहे .
         सदर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह विहिरी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी गहुरी येथे पाठवण्यात आला आहे .

               या घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेतली असून संतप्त झालेली नातेवाईक आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले आहे .एकुलत्या एक सुनेवर हा आमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे अशा रोशात नातेवाईकांमध्ये आक्रोश दिसत होता.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 

close