अहमदनगर । प्रतिनिधी :-
जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर कार्यालयासमोर कुटुंबांचे आमरण उपोशन चालू होते.उपोषणाच्या चौथ्या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी,गटविकास अधिकारी नगर,विस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांच्या प्रयत्नाला यश आले. गटविकास अधिकारी खरात यांनी उपोषण कर्ते यांना कायदेशीर कार्यवाहीची सविस्तर माहिती समजावून सांगितली.
तसेच अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीचे तसेच दोन पुढील महिन्यात अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही केली जाईल. ग्रामसेवक यांना लेखी आश्वासनाचे पत्र उपोषण कर्ते यांना दिले आहे. त्यानंतर उपोषण कर्ते यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले.
उपोषण सोडण्याच्या वेळी संजय खामकर, प्रकाश पोटे, विश्वासराव जाधव, सागर कोळपकर आदी मान्यवर उपस्थित होते.!