हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली: शहरातील भारतीय विद्या मंदिर श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक तथा शिक्षकेतर संघटनेचे हिंगोली तालुका अध्यक्ष व प्रयोगशाळा सहाय्यक जिल्हा सचिव,कै.रामराव बांगर सेवाभावी संस्था अध्यक्ष व भा.वि.म.से सं. संचालक गजानन बांगर यांनी आपल्या कडे आलेली ६० हजार रुपये ज्यादा रक्कम बँकेला परत केली असल्याने अद्यापही माणुसकी व इमानदारी जागृत असल्याची जाणीव गजानन बांगर यांच्या स्वरूपाने निदर्शनास आली आहे.
गजानन बांगर यांनी दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा हिंगोली या खात्यातून रक्कम काढली होती सदरील रक्कम त्यांनी घेऊन ते न मोजता निघून गेले परंतु त्यांना घरी गेल्यानंतर त्यांनी रक्कम मोजली असता त्यामध्ये साठ हजार रुपये ज्यादा रक्कम आली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी त्वरित दि.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा हिंगोली चे शाखाधिकारी दिपकराव सरनायक यांच्याशी संपर्क साधून माझ्याकडे साठ हजार रुपये जास्तीची रक्कम आल्याचे सांगितले त्यांनी बँकेमध्ये जाऊन सदरील रक्कम शाखाधिकारी दिपकराव सरनायक यांच्या उपस्थितीत रोखपाल मांडगे व ठाकरे वरिष्ठ लिपिकयांच्या कडे सुपूर्द केली. आजकालच्या धावपळीच्या व इमानदारी संपत चाललेल्या दुनियेमध्ये अद्यापही इमानदारी शिल्लक असल्याचे जिवंत उदाहरण म्हणजे गजानन बांगर हे होय कारण पाचशेची नोट जरी जास्त आली तरी ती कोणी परत करीत नाहीत परंतु ६० हजार रुपये जास्त येऊन देखील बांगर यांनी सदरील रक्कम परत केली बांगर यांचे बँकेच्या सर्व कर्मचाऱ्याकडून आभार मानले असून त्यांचे या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकचा वर्षाव होत आहे.