विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी -लेखक महादेव चव्हाण
इंदापूर प्रतिनिधी:आज भारतरत्न डॉक्टर ए .पी .जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जूनियर कॉलेज मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत लेखक महादेव चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले. ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून त्यांची चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या निमित्ताने वाचनाचे महत्त्व पटवून देताना चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन केले. पुस्तके तुम्हाला जगायला शिकवतात त्यामुळे पुस्तकाच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवला पाहिजे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. थोर शास्त्रज्ञ, भारत देशाचे राष्ट्रपती, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे कार्य किती महान होते हे सांगितले.वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचन करावे म्हणजे विद्यार्थ्यांचा विकास यातूनच होईल. विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे, पर्यवेक्षक विजय शिंदे, लेखक महादेव चव्हाण, हमीदभाई आतार यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींची डॉक्टर कलाम यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली. या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पुस्तक आणि पेन भेट दिला. विद्यार्थ्यांनी एक तास अवांतर पुस्तकाचे वाचन केले. लेखक महादेव चव्हाण सर,सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, यांचा शाळेमार्फत शाल, श्रीफळ ,आणि पुस्तक, पेन, भेट देऊन सत्कार करण्यात आला . ग्रंथपाल पुष्पा लोंढे व संजय गायकवाड यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली . कार्यक्रमाच्या शेवटी लेखक महादेव चव्हाण लिखित ईष्या॔ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या शुभहस्ते करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्व शिक्षकांना पुस्तके भेट दिली . तसेच शाळेतील वाचनाल्यासाठी ५००० रुपयेची देणगी दिली. विद्यार्थ्यांनी वाचनालयात जाऊन पुस्तके वाचावी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी हाच उद्देश लेखकाचा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील मोहिते यांनी केले .सूत्रसंचालन प्रिया भोंग यांनी तर पुष्पा लोंढे यांनी आभार मानले.