shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापुरात शाळेत खेळणी वाटप करुन अनोख्या पद्धतीने पैगंबर जयंती सजारी

बेलापूर:-
गौसे आजम सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निम्ति बेलापुरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले बेलापुर बु।।या ठिकाणी शाळेत विद्यार्थीना खेळणी वाटप करण्यात आली.

यावेळी उपस्थिति मान्यवर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुस्ताक शेख, शफीक बागवान, विद्यार्थी कांग्रेस प्रदेश सचिव अक्षय पाटील नाईक, यांनी आपले मनोगत वक्त केले तसेच गौसे आजम सेवा भावी संस्था चे संस्थापक अध्यक्ष अली सय्यद यांनी मनोगत करताना सांगितले की गौसे आजम सेवा भावी संस्था ही बेलापुरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यत काम करते ही संस्था असे नव नविन उपक्रम सतत घेत असते आज ही कार्यक्रम हज़रत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निम्ति हा कार्यक्रम आयोजित केला आहेत आज खेलणी वाटप करण्याचा प्रमुख कारण म्हणजे आज लहान लहान शालेय मुले मोबाइल, लैपटॉप विडिओ गेम असे उपकरणाचा मोठ्या प्रमाणत वापरत आहेत. त्यामुळे त्यांच्या बुद्धि चा विकास होतो. पण शारीरिक विकास कमी होत आहे. लहान लहान मुले मोबाइलचा वापर करत असल्याने त्याचा लक्ष मैदानी खेळाकड़े फार कमी होत आहे म्हणून कमीत कमी शाळेत खेळ खेळून शारीरिक व्यायाम होण्यास मदत होईल. या उद्देश्याने हें कार्यक्रम आयोजित केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय पालक समिति चे अध्यक्ष राजू सय्यद, गौसे आजम सेवा भावी संस्थाचे अध्यक्ष सुल्तान शेख, सचिव नौशाद शेख, सदस्य आरिफ शेख,तसेच मुलीची शाळेचे पालक समित अध्यक्ष अजीज शेख सामाजिक कार्यकरते शफीक आत्तार,मोहसिन सय्यद रेहान शेख,इ मान्यवर उपस्थिति होते व गौसे आजम सेवा भावी संस्थाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुल्तान शेख यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा व मराठी शाळेच्या शिक्षक वर्गाचा उत्तम प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वाचे आभार मानण्यात आले.
close