*रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ या संविधान दिनी संपादकांचा राज्यव्यापी महामेळावा..
अजिजभाई शेख - राहाता
स्वाभिमानी संपादक सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश या लघु वर्तमानपत्र संपादकांच्या नोंदणीकृत राज्यव्यापी संघटनेची संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११,०० वाजता श्रीरामपूर येथील कॉलेज रोडवरील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट याठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश महासचिव ॲड. मोहसिन शौकत शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली.
या बैठकीत राज्यभरातील लघु वर्तमानपत्र संपादकांच्या विविध आडचणी आणी त्यावरील उपाय योजना,शासन दरबारी करण्यात येणारा कागदपत्रांचा योग्य पाठपुरावा यासह राज्याच्या प्रत्येक जिल्हा,तालुका,शहर आदि ठिकाणी स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशी पदे वाटप करण्यासंदर्भात सोबतच संपादक संघाच्यावतीने रविवार दि.२६ नोव्हेंबर २०२३ या संविधान दिनी घेण्यात येत असलेल्या राज्यव्यापी संपादक महामेळाव्याची रुपरेषा ठरवली जाणार आहे,तसेच ई-पेपर्स, नवीन वर्तमानपत्र,नवीन न्यूज पोर्टल,नवीन यूट्यूब चॅनल्स सुरु करु इच्छिणाऱ्या नवोदित पत्रकार /संपादकांसाठी त्यांच्या प्रसार माध्यमांकरीता *(वर्तमानपत्र अंक डीटीपी - कलर पीडीएफ / यूट्यूब न्यूज चॅनल्ससाठी निवेदकासह व्हिडिओ न्यूज एडिटिंग बातम्या / ई-पेपर्स / न्यूज पोर्टल्स आदि. सेवा)आवश्यक सेवा सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, करीता बैठकीत नवोदित संपादक / वार्ताहरांनी जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग नोंदवावा असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सदरील बैठकीसाठी उपस्थित राहु इच्छिणाऱ्या (स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे सभासद नसलेल्या) नवोदित संपादक / वार्ताहर यांनी प्रथमतः 9561174111 या व्हॅटसॲप क्रमांकावर आपले नांव,गांव,पत्ता मोबाईल क्रमांक/ ई- मेल आयडी आणी वर नमूद बाबत हवी असलेली समस्या/सेवा/ सुविधा/
कळविणे आवश्यक आहे.
तसेच स्वाभिमानी संपादक सेवा संघ या संस्थेच्या शहर/तालुका/ जिल्हास्तरीय पदाधिकारी निवडीत, नियमित प्रसारित होणाऱ्या प्रसार माध्यमांच्या संपादकांनाच स्थान मिळणार आहे,ज्यांचे प्रसार माध्यमे हे नियमितपणे प्रकाशित होत आहेत,अथवा ते आपली प्रसार माध्यमे नियमितपणे प्रकाशित करु इच्छितात त्यांच्यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असल्याचेही शेवटी या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111