shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रभाषा हिंदी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी भाषा आहे- डॉ.उत्तम येवले

राष्ट्रभाषा हिंदी  सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी भाषा आहे- डॉ.उत्तम येवले

बेलापूर प्रतिनिधी:
राष्ट्रभाषा हिंदी ही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजणारी भाषा आहे असे उद्गार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोल्हारचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. उत्तम येवले यांनी काढले.

हिंदी विभाग, वाणिज्य विभाग, वाड.मय विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रभाषा हिंदी दिवस, नाटिका सादरीकरण, मंडळ उद्घाटन आणि इंडक्शन प्रोग्राम या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की हिंदी ही भारताची प्रमुख भाषा आहे.पुढे त्यांनी राष्ट्रभाषेचा प्रचार ,प्रसार आणि महत्त्व विषद केले. या भाषेने माध्यमातून कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय कामकाज, मोबाईल व कॉम्प्युटरमध्ये आपला जम बसवला आहे.या भाषेत बैंक रेलवेच्या भरती परीक्षेचे आयोजन केले जाते, हे देखील सांगितले. हिंदी भाषा ही बहुप्रांतीय भाषा असून देखील या भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे. परंतु बहुप्रांतीय लोक हिंदीतूनच व्यवहार करत असल्यामुळे ही भाषा राष्ट्रभाषा आहे. इतर भाषा संपूर्ण भारतात न  बोलल्यामुळे त्यांचा विकास होऊ शकला नाही असे त्यांनी सांगितले.राष्ट्रभाषा हिंदी दिवसानिमित्त कॉलेज कट्ट्यावर "नारीशक्ती" नाटिका सादरीकरण केले.यात जया काळे, प्राजक्ता पुजारी, नेहा देवरे, वैष्णवी गाडे, तृप्ती म्हसे, अली शेख,साजेब बागवान, आकाश पारखे,तनुजा गाढे, रितेश जाधव यांनी अभिनय केला.सदर कार्यक्रमात  वाड.मय मंडळ, वाणिज्य मंडळ, सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच "बिल्वदल" या मराठी,हिंदी, इंग्रजी भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.याचे संपादन जया काळे,सिद्धाली नवले,अंकिता जगताप या विद्यार्थींनींनी केले. कार्यक्रमासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.शरद सोमाणी, महाविद्यालयीन विकास समिती चेअरमन राजेश खटोड, विश्वस्त नंदुशेठ खटोड, मा. चंद्रशेखर डावरे, बापूसाहेब पुजारी ,भरत साळुंके,रविंद्र खटोड आदि उपस्थित होते .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रो. डॉ. गुंफा कोकाटे यांनी भुषविले. या कार्यक्रमा अंतर्गत नंदुशेठ खटोड  यांनी हिंदी भाषा ही प्रमुख भाषा असून या भाषे शिवाय पर्याय नाही असे सांगितले. चंद्रशेखर डावरे यांनी हिंदी भाषा ही अनेक राज्यामध्ये बोलली जाणारी एकमेव भाषा आहे असे उद्गार काढले . प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुनिता पठारे यांनी केले तर आभार  प्रा.अमृता गायकवाड यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व  प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561274111
close