श्रीरामपूर (वार्ताहर ):- 31मे 1725ते 13आगस्ट 1795या 70वर्षाच्या कालखंडात ज्यांनी भारतीय इतिहास शिवभक्ती आणि लोकल्याणकारी दृष्टीने वीरश्री म्हणून नावलौकिक प्राप्त केला, त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या आदर्श स्त्री राज्यकर्त्या होऊन गेल्या,त्यांचे कार्य आणि जीवनविचार सदैव प्रेरणादायी असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील सेवानिवृत्त अप्पर सहकार आयुक्त तथा पणन संचालक, महाराष्ट्र राज्य डॉ. सुभाषराव माने यांनी व्यक्त केले.
येथील अहमदनगर जिल्हा यशवंत नागऱी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 228व्या पुण्यतिथीनिमित्त बेलापूर रोडवरील ऑकेजन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सुभाषराव माने बोलत होते. अध्यक्षस्थानी अड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते.
व्यासपीठावर श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथील ह. भ. प.निवृत्त महाराज मतकर,व्हा. चेअरमन मधुकरराव सातव, जनरल मॅनेंजर माधवराव निंबाळकर, माजी तहसीलदार व संचालक गुलाबराव पादीर,रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये,प्रा.शिवाजीराव बारगळ,संतोष मते, आदी उपस्थित होते.लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि
दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व्हा.चेअरमन मधुकरराव सातव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.मान्यवरांना शाल, बुके, शाल, सन्मानचिन्ह देऊन संचालक मंडळातील सदस्यांनी सत्कार केले.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी 'लॉकडाऊनच्या कविता ', 'समाजचिंतन 'ही पुस्तके देऊन मान्यवरांचा सत्कार केला.ह. भ. प. निवृत्ती महाराज मतकर यांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.प्रमुख वक्ते डॉ.सुभाषराव माने यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या एकमेव स्त्री पुण्यश्लोक पदवीला पोचल्या होत्या.त्यांनी श्रीशिवलिंग हाती जसे धारण केलेले होते,तसेच त्यांनी घोड्यावर स्वार होऊन हाती तलवार घेऊन दुष्ट,अत्याचारी परकीय लोकांपासून जनतेचे रक्षण केले.
एक लढाऊ वीरश्री म्हणून त्यांची प्रतिमा अधिकच आदर्श आहे. आजच्या महिलासबलीकरणासाठी त्यांचे जीवनचरित्र समोर ठेवले पाहिजे, असे सांगून त्यांनी यशवंत नागरी पतसंस्था स्थापनेत एल. पी. दातीर आदी मंडळींनी केलेले प्रयत्न फारच मौलिक आहेत.ही पतसंस्था स्थापनेच्या कार्यात मला काही सहकार्य करण्याची संधी लाभली,त्याबद्दल आठवणी सांगून आज पतसंस्थेने केलेल्या प्रगतीचे, आदर्श, शिस्तशीर संचालकांचे कौतुक केले.अध्यक्ष भाषणातून प्राचार्य टी. ई. शेळके यांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी केलेल्या रस्ते, पाणी, झाडे,कुटुंब, धार्मिक,ग्रामविकास इत्यादी उपक्रमाचा आढावा घेऊन यशवंत नागरी पतसंस्था कार्याचे सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.
कार्यक्रमासाठीविश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, मोठ्याभाऊ दातीर, वसंतराव बारगळ, बाळासाहेब लांडे, साहेबराव रकटे, अंशुमन वाकचौरे, एकनाथराव खेडेकर,रावसाहेब करडे,गजानन पुंड,दत्तात्रय गावडे, सौ.सुरेखाताई सातव,सौ.मनीषाताई गवळी, अमोल कदम आदी स्त्री पुरुष संचालक आणि अनेक हितचिंतक उपस्थित होते.नगर आकाशवाणीचे संतोष मते यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक प्रकाशराव करडे यांनी आभार मानले.