बेलापूर प्रतिनिधी:
गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात आगोदर धावत येतात ते पोलीस दादा ,असेच सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादाने केलेल्या अचुक उपचारामुळे व आमदार लहु कानडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकताच एका नागरीकाला जीवदान मिळाले असुन आता तो रुग्ण रुग्णालयात व्यवस्थित उपचार घेत आहे.
या बाबत घडलेली हकीकत अशी की, बेलापूर येथील साई मंदिरात तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांबाबत बैठक बोलविण्यात आली होती, या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, मंदिरात आमदार लहु कानडे हे भाषण करत असताना त्या ठिकाणी तान्हाजी बापुराव शेलार (वय ७८ वर्ष) हे साई मंदिरांच्या पायरीवर बसले होते, त्यांना अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला, अन् सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले, तेथुन काही अंतरावर द्वारकामाई जवळ बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ आणि नंदु लोखंडे हे उभे होते,गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे त्या ठिकाणी गेले असता बघीतले की एका इसमाची फारच तब्येत ढसाळली आहे,अशावेळी क्षणाचाही विलंब न करता हरिष पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले, त्यानी त्यांचा श्वास पाहीला मानेजवळ बघीतले सर्व शरीर गार पडले होते, त्यांनी तातडीने तान्हाजी शेलार यांची छाती दाबली ठरावीक पद्धतीने छाती पंपीग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला,आमदार लहु कानडे हे देखील मदतीसाठी पुढे धावले, बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, रमेश आमोलीक, प्रसाद खराद, सुरेश अमोलीक, गौरव सिकची,सुहास शेलार यांनी तान्हाजी शेलार यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्याची व्यवस्था केली. श्रीरामपुर येथील संतलुक हॉस्पीटल येथे त्याचेवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले असुन त्यांची प्रकृती सुधारत आहे.
पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शेलार यांना जीवनदान मिळाले आहे .या बाबत शेलार परिवाराने बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ, नंदु लोखंडे यांना धन्यवाद दिले आहे. बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ यांनी केलेल्या कार्याबद्दल शेलार परिवार व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ तसेच पोलीस काँन्स्टेबल नंदु लोखंडे आणी श्री. शेलार यांना वाचविण्यासाठी धडपड करणारे बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, रमेश अमोली, प्रसाद खराद, सुहास शेलार, गौरव सिकची, सुरेश अमोलीक यांचाही सत्कार कारण्यात आला. यावेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, महेश ओहोळ, असलम बिनसाद, किशोर कदम, पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश कुऱ्हे , बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, संपत बढे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर महेश ओहोळ यांनी आभार मानले.
*सहयोगी:
पत्रकार देवीदास देसाई -बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111