बी.आर.चेडे - शिरसगांव
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथील सोसायटीची ७१ वी वार्षिक सर्व साधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सोसायटी सभासदांना १० टक्के लाभांश संस्थेचे चेअरमन किशोर पाटील यांनी जाहीर केला जो दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येईल.त्याचप्रमाणे ३० जून रोजी सोसायटीची १०० टक्के वसुली झाली ही एक आनंदाची बाब असून संस्थेची प्रगतीकडील वाटचाल गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी अविनाश आदिक यांनी यावेळी केले .
सदरील सभा किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,चेअरमन किशोर पाटील यांनी प्रास्तविक केले.सचिव सुभाष यादव यांनी सभेचे अहवाल वाचन करून सर्व विषय सांगितले.
पत्रिकेवरील सर्व विषय व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. रवींद्र कुटे,सौ. कुटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य पतसंस्था फेडरेशनवर निवड झाल्याबद्दल सिद्धिविनायक पतसंस्था चेअरमन वासुदेव काळे यांचा सत्कार करण्यात आला.मर्चंट बँक संचालकपदी निवड झाल्याबद्दल गौतम उपाध्ये यांचा अविनाश आदिक व ज्येष्ठ नेते इंद्रनाथ पा.थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील सहकारातील ज्येष्ठ उत्तमराव पवार,सी.वाय. पवार, लहानू नाईक,भास्करराव लिप्टे, शंकरराव आढाव,ज्ञानेश्वर (माउली) मुरकुटे,पी.आर. शिंदे, शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, जितेंद्र भोसले,कैलास बोर्डे,सुनील थोरात,हंसराज आदिक,यशवंत लवांडे,तसेच ज्येष्ठ सभासद यांचा सत्कार करण्यात आला.
सभेत संस्थेचे नामांतर श्री.जी. के. पाटील विविध कार्यकारी सोसायटी असे करावे असा ठराव दिनकर यादव यांनी मांडला.त्यास सत्यनारायण उपाध्ये यांनी अनुमोदन दिले.तो मंजूर करण्यात आला.ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात,ज्ञानेश्वर मुरकुटे,सुरेश ताके.आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष सुभाष बोंबले,साईनाथ गवारे,सोपानराव गवारे,रामचंद्र पाटील,संजय रामदास गवारे,नवनाथ ताके, शंकरराव गायकवाड, गणेशराव मुद्गुले,दिनकर यादव,माधवराव पवार,शशिकांत गवारे, बाळासाहेब गवारे,भाऊ गवारे, सुभाष यादव,संदीप रोकडे,संदीप गवारे,सतीश गवारे,विजय गायकवाड,विश्वनाथ गवारे,आदी उपस्थित होते.शेवटी चांगदेव बकाल यांनी आभार मानले.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

