shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा उद्योजक निंभोरे गावचे बाबुराव भारत कळसाईत नॅशनल ईनस्पायर अवॉर्ड ने सन्मानीत.

युवा उद्योजक  निंभोरे गावचे  बाबुराव भारत कळसाईत  नॅशनल ईनस्पायर अवॉर्ड ने सन्मानीत.

कृषी भूषण महाराष्ट्र एफ.पी. ओ. फेडरेशन आयोजित कृषी उद्योजकता महा परिषद नाशिक व एजीसी इव्हेंट प्रस्तुत 6 वा नॅशनल इन्स्पायर अवॉर्ड २०२३ सोहळा संपन्न.

सामाजिक ,औद्योगिक व संशोधनात्मक कार्यामध्ये कार्यकत्पर असणारे बाबुराव कळसाईत यांचे सर्व युवा नेते महिंद्र रेडके यांनी केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधि: 
इंदापूर प्रतिनिधि: नाशिक येथे दि.२७ सप्टेंबर रोजी कृषी भूषण महाराष्ट्र. एफ.पी. ओ. फेडरेशन आयोजित कृषी उद्योजकता महा परिषद नाशिक व एजीसी इव्हेंट प्रस्तुत 6 वा नॅशनल इन्स्पायर अवॉर्ड 2023 हा युवा उद्योजक  निंभोरे गावचे  बाबुराव भारत कळसाईत यांना ईनस्पायर अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आले.  हा पुरस्कार त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू प्रा. संजीव सोनवने व अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्य लेखापाल सिए चतुर्वेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ .तुळशीदास बास्टेवाड, ऍग्रोकेअर ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन भूषण निकम, आबा अहिरे, आयोजक रोहिणी पाटील ,प्रकाश सांगळे  उपस्थित होते.
श्री बाबुराव भारत कळसाईत व त्यांचे बंधू गोरख भारत कळसाईत रा.निंभोरे,ता.करमाळा यांनी शेतीमध्ये उपयोगी अनेक अवजारांचे संशोधन केले असून जेऊर येथे त्यांचा श्रीनाथ इंजीनियरिंग वर्क्स या नावाचे शेती अवजारे बनवण्याचा वर्कशॉप आहे.स्वतः संशोधन व प्रगत तंत्रज्ञान वापरून कृषी क्षेत्रासाठी आवश्यक ऊस लावणी यंत्र उसाची आंतरमशागत व खत पेरणी यंत्र सर्व प्रकारची पेरणी यंत्रे याचे संशोधन करून अवजारांची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या अनेक अवजारांची दक्षिण आफ्रिका व फिलिपाईन्स या देशांमध्ये निर्यात केली आहे. याबरोबर सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर साठी लागणारी अवजारे ते तयार करतात याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. श्री कळसाईत यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत जेऊर कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले व पोलीस नाकाबंदी साठी पोलीस विभागाला मोफत बँरेकेट्स पुरवठा केला. यापूर्वी त्यांना सोलापूर सोशल फाउंडेशन च्या वतीने श्रीमंती सोलापूरची या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला आहे. तसेच सामाजिक ,औद्योगिक व संशोधनात्मक कार्यामध्ये कार्यकत्पर असणारे बाबुराव कळसाई यांचे  युवा नेते महेंद्र रेडके यांनी  अभिनंदन केले
       
हा पुरस्कार स्वीकारतेवेळी केमिस्ट चीफ इंजिनियर बाळासाहेब लोहार, सामाजिक कार्यकर्ते सुशील चव्हाण, सतीश पाठक, गणेश नवगन, व नवनाथ थेटे महाराज इ. उपस्थित होते.
close