इंदापूर प्रतिनिधि: हजरत पैगंबर जयंती निमीत्त खडकपुरा इंदापूर शहर येथे तेजपृथ्वी ग्रुप कडून सर्व मुस्लिम बांधवांना मिठाई व पाणी वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिताताई खरात व तेजपृथ्वी ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की, आपण सर्व भाई बहन आहोत.जात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकी आणि माणूस हाच आमच्यासाठी जात धर्म आहे.
आणि आपण सर्व सन उत्सव एकत्र करणे काळाची गरज आहे.आपण जेव्हा अडचणीत असतो. त्यावेळी जो आपल्याजवळ प्रथम येतो तोच आपल्यासाठी आपला संकट मोचन होतो. मग त्यावेळेस आपण जात धर्म बघत नसेल तर इतर वेळी ही जात धर्म न बघता आपण सर्व या भारत मातेची लेकर आहे. या भावनेने राहिले पाहिजे.मी माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना हजरत पैगंबर जयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देते.