श्रीरामपूर-
येथील वॉर्ड नंबर एक मधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे श्रीरामपूर वीरशैव लिंगायत समाज प्रवचन, चिंतन कार्यक्रम आयोजित केला असून श्रीरामपूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष संदेश शाहीर यांच्या अध्यक्षतेखाली ह.भ.प.प्रा.सखाराम कर्डिले महाराज यांचे 'महात्मा बसवेश्वर 'या विषयावर व्याख्यान होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
श्रीरामपूर वीरशैव लिगायत समाज एक जागृत आणि सेवाशील समाज आहे.समता आणि बंधुभाव या तत्वावर नव्या समाजरचनेची पुनर्मांडणी करणारे महात्मा बसवेश्वर हॆ समाजाचे श्रद्धास्थान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या विवेकशील विचारांची प्रबोधनात्मक आणि एकतारुपी जाणिवेतून प्रवचन व विचार बैठक 01ऑक्टोबर 2023रोजी सकाळी10:30वाजता प्रतिष्ठान कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, समन्वयक, मार्गदर्शक डॉ. बाबुराव उपाध्ये, सदस्य सुदामराव औताडे पाटील यांनी उपक्रमास मार्गदर्शन दिले असून या कार्यक्रमास उपस्थित राहवे असे प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी आवाहन केले.