श्रीरामपूर (वार्ताहर:- परमेश्वर आपल्यावर कृपा करतो आणि आपण माणुसकी जपतो.कोणाच्याही दुःखात आधार देणे हीच खरी देवपूजा होय, असे भावपूर्ण उदगार छत्रपती संभाजीनगर येथील रेव्ह. बिशप रमेशजी गायकवाड यांनी काढले.
श्रीरामपूर भागातील इंदिरानगर येथील कै. हर्षद शिवाजी भोसले परिवारावर दुःखाचा आघात झाला.श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेचे खातेदार असलेले कै. हर्षद भोसले यांच्या कर्जमाफी आणि मदतनिधी कुटुंबास पत्रप्रदान करण्यात आले,त्याप्रसंगी रेव्ह. बिशप गायकवाड बोलत होते.अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते.पतसंस्थेचे आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांनी प्रास्ताविक करून कै. भोसले यांच्या अचानक निधनाचा वृत्तांत आणि व्यक्तिमत्वाचा मोठेपणा सांगितला.'ज्योत अनंतात विलीन झाली,स्मृती आठवणींनी दाटून आली,भावसुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रद्धांजली 'असे शब्दभाव व्यक्त करीत. कडूभाऊ काळे व नागेबाबा परिवाराचे सेवाकार्य हॆ माणुसकीचे असल्याचे सांगितले. यावेळी श्रीमती भोसले, श्री रमेश वलेकर, अमित बोरावके, बँकेचे प्रतिनिधी मावससाहेब, किरण मिसाळ, अशोक गायकवाड, भोसले परिवार उपस्थित होते. रेव्ह. बिशप रमेशजी गायकवाड यांनी भोसले परिवारावर आलेल्या दुःखाचे निवारण हॆ काळच करणार आहे पण माणसाने माणुसकीचे सत्कर्म केले पाहिजे, हॆ कार्य श्रीसंत नागेबाबा पतसंस्था करीत असल्याबद्दल कौतुक केले.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी एक माणुसकीसंपन्न भोसले परिवार इंदिरानगरमध्ये सर्वप्रिय आहेत. जन्म -जीवन -मरण ही त्रिसूत्री कुणाला चुकत नाही तरी एकमेकांना मानसिक, आर्थिक आधार यांची गरज असते, हाच खरा माणुसकीचा धर्म आहे.धर्म देवाच्या जवळ नेतो तर सत्कर्म हॆ माणसालाच देव करते, असे सत्कार्य आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड अनेक परिवारासाठी करतात याबद्दल आठवणी सांगितल्या.सुभाषराव गायकवाड यांनी समारोप केला.