shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मित्रवर्य डॉ. बाबुराव उपाध्ये यांची साहित्यनिर्मिती आणि वाचनालय पाहून भारावून गेलो =रेव्ह. बिशप रमेशजी गायकवाड


श्रीरामपूर (वार्ताहर ):- तब्बल 51वर्षानंतर मित्रवर्य प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांची भेट झाली.त्यांचे साहित्यिक, सामाजिक कार्य वाचून, ऐकून होतोच, प्रत्यक्ष भेटीत त्यांची साहित्यनिर्मिती आणि वाचनालय पाहून मनापासून भारावलो, असे गौरवोद्गार छत्रपती संभाजीनगर येथील रेव्ह. बिशप रमेशजी गायकवाड यांनी काढले. 

श्रीरामपूर भागातील इंदिरानगर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे रेव्ह. बिशप रमेशजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी रेव्ह. बिशप गायकवाड बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपले आत्मचरित्र 'फिरत्या चाकावरती ', डॉ. रामकृष्ण जगताप लिखित 'पोरका बाबू ', 'लेखणीचे झाड'आणि अनेक पुस्तके भेट, शाल  देऊन रेव्ह. बिशप गायकवाड, किरण मिसाळ, अशोक गायकवाड, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड यांचा सत्कार केले.डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या आठवणी सांगताना म्हणाले, माझ्या पोरक्या जीवनात अनेक हृदयस्थ मित्र भेटले, त्यापैकी 1972च्या दुष्काळी वाटेवर भेटलेले रमेश गायकवाड हॆ जीवनातले तीर्थक्षेत्र आहे, अशा मित्रापुढे मी विनम्र आहे.वडाळा महादेव येथील  रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेताना खूप उपासमार झाली.अनेक दुःखद प्रसंग उदभवले अशा वेळी रमेश गायकवाड नसते तर मरण अटळ होते,अशा आठवणी सांगितल्या. रेव्ह. बिशप गायकवाड यांनी  आत्मकथनातील व इतर पुस्तकातील हॆ सर्व प्रसंग, आठवणी  वाचून आनंद व्यक्त करीत ते म्हणाले, शाळेपासून डॉ. उपाध्ये हॆ लेखन,वाचन आणि चिंतनात एकरूप असत, त्यांच्या लेखनात प्रांजळ अनुभव आहेत. असे लेखन वाचून जीवन धन्य होते, हॆ मराठी भाषेचे भूषण आहे. 

यावेळी डॉ. रामचंद्र जाधव यांच्या 'अंधारातून प्रकाशाकडे 'ह्या आत्मचरित्रावरही चर्चा झाली.डॉ.रामचंद्र जाधव यांनी आपल्या भावना दूरदर्शी पद्धतीने व्यक्त केल्या. किरण मिसाळ यांनी 'साहित्यस्नेह ', 'साहित्यशिल्प 'हॆ गौरवग्रन्थ दिल्यामुळे भेटीची ओढ निर्माण झाली असेही रेव्ह. बिशप गायकवाड यांनी सांगितले. अशोक गायकवाड, किरण मिसाळ यांनी झोडपट्टीतील मुलांना डॉ. उपाध्ये यांनी कसे शिक्षण दिले, त्या आपल्या आठवणी सांगितल्या. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.
close