शिर्डी-.
भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेशजी भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या मान्यतेने आज प्रदेश भाजपा किसान मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
प्रदेश किसान मोर्चाचे प्रभारी व राज्य भाजपचे सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर , तसेच प्रभारी ज्ञानोबाजी (भाई) मुंडे यांच्या संमतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आपल्या सर्वांचे मित्र,भारतीय जनता पार्टीचे नेते व स्व. संभाजीराजे थोरात फाऊंडेशन संगमनेर जि.अ.नगर चे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
व रविंद्र थोरात यांच्या हातून महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांची सेवा घडावी. यासाठी पार्टीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.