श्रीरामपूर प्रतिनिधी:
रेल्वे प्रशासनाने श्रीरामपूर शहरातील उत्तर आणि दक्षिण बाजूस गेली पन्नास वर्षापासून राहत असलेल्या लोकांना जागा खाली करण्याबाबत पी पी ई नुसार शोकेस नोटीस बजावली आहे.
लोकांची घरे व दुकाने काढल्यास कुटुंबाचे कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर येत देशोधडीला लागतील करीता याची सर्व राजकीय पक्ष, संघटनांनी गंभीर दखल घेऊन श्रीरामपूर रेल्वे स्टेशन प्रबंधक एम.पी.पांडे यांच्याकडे सोलापूर डिव्हिजन रेल्वे प्रशासला देण्यासाठी निवेदन दिले,याप्रसंगी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक विद्याशूसिंह, कॉन्स्टेबल एम.बी. तायडे उपस्थित होते.
सदरील निवेदनात असे म्हटले आहे की, गेली पन्नास वर्षापासून अधीक काळापासून सदरील जागेत लोकांची घरे आणी दुकाने असुन काहींचे एन. ए. लेआऊट प्लॉट आहेत, तरी देखील रेल्वे प्रशासनाने त्यांना नोटिसा वाजवून घरे व दुकाने काढण्यास सांगितले आहे. सदरील लोकांवर अन्याय झाल्यास लवकरच सर्वपक्षीय मिटिंग घेवून सर्वपक्षीय रेल रोको आंदोलन करण्याचाइशारा देण्यात आला आहे.
तसेच लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव,अंबादास दानवे यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेट घेऊन बेलापूर श्रीरामपूरच्या या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करणार आहे.
सदरील निवेदनावर रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर,शिवसेना (शिंदे गट) युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, भाजपा शहराध्यक्ष मारुती बिंगले, वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, बी.आर.एस. चे समन्वयक प्रवीण फरगडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष मोकळ, अ.भा.लहुजी सेनेचे राष्ट्रीय महासचिव हनीफभाई पठाण, रिपाई (ए) चे युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे ,बाळासाहेब बागुल, बसपाचे जिल्हाध्यक्ष सुनील मगर, शिवसेना (उबाठा) सचिन बडदे, आरपीआयचे कार्याध्यक्ष अंतोन शेळके, सामाजिक कार्यकर्ते योगेश जाधव,भीमशक्तीचे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे, लकी सेठी, राजेश वाव्हळ , महादेव होवळ,अरुण सनी बारसे खंडीझोड आदि उपस्थित होते.
*सहयोगी:*
पत्रकार दीपक कदम -श्रीरामपूर
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111