स्पर्धेत महिलांचा उत्सफुर्त सहभाग,सरपंच रूपाली मुंडेंचा उपक्रम..!!
प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
देवगाव येथे सरपंच रूपाली मुंडे यांच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखिल आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांचा आकर्षक बक्षिसे देऊन गुणगौरव करण्यात आला आहे.
देवगाव येथे गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने सरपंच रूपालीअतुल मुंडे यांच्या संकल्पनेतून सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या बक्षिस वितरणाच्या प्रसंगी ह.भ.प.केशव महाराज शास्त्री टाकळीकर यांचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले.
यामध्ये प्रथम येणार्या स्पर्धक महिलेला १५०० रूपयांचा धनादेश सौ.कृष्णाबाई मुंडे व सरपंच रूपाली अतुल मुंडे यांच्या हस्ते धनादेश देऊन गौरविण्यात आले.तर दूतिय क्रमांक पटकवलेल्या दोन महिला स्पर्धकांना प्रत्येकी १००० तर तृतीय क्रमांक पटकवलेल्या तीन महिला स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रूपये देऊण गौरविण्यात आले आहे.तर १६ महिलांना उत्तेजनार्थ पैठणी देऊण सन्मानित करण्यात आले.यावेळी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे,युवा नेते अतुल (दादा) मुंडे यांच्यासह परिसरातील भाविक-भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.