अहमदरजा सोशल फौंडेशन चा स्तुत्य उपक्रम.*
पैगंबर जयंती निम्मीत सर्व गणेश भक्तांना केले सरबत वाटप.
इंदापूर प्रतिनिधि : अहमद रजा सोशल फौंडेशन नेहमीच सामाजिक बंधुभाव जपण्यासाठी अग्रेसर असते. यावेळी ही अहमद रजा सोशल फौंडेशन ने स्तुत्य उपक्रम राबवला. निमित्त होते गणपती विसर्जन व मोहम्मद पैगंबर जयंतीचे.
अहमद रजा सोशल फौंडेशन सारख्या सामाजिक संस्था माणूस केंद्रबिंदू मानून जाती धर्मात बंधूभाव निर्माण करून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारनंतर बऱ्यापैकी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे गणेश भक्तांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये तसेच नाचताना घामामुळे शारिरीक थकवा जाणवू नये म्हणून अहमद रजा सोशल फौंडेशन च्या वतीने मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून सरबत वाटप करण्यात आले.
यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, सर्व सामान्य जनतेला विषमता मान्य नाही. पुर्वी पासुनच या ना त्या कारणाने हिंदू - मुस्लिम ऐक्य दिसून येते. परंतु काही असामाजिक तत्व त्यांचे स्वहित साधण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करत असतात. अशा असामाजिक तत्त्वांना वेळीच ओळखून नवतरुणांनी मोहम्मद पैगंबर साहब यांना अभिप्रेत असणारा अमन, शांती आणि बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी पुढे आले पाहिजे असा संदेश अहमद रजा सोशल फौंडेशन च्या कार्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून दिला.
यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. दिलीप पवार साहेब यांचा मिरवणूकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या प्रकारे मेहनत घेतली, त्याबद्दल अहमद रजा सोशल फौंडेशन च्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सर्व गणेश मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून मिरवणूका शिस्तबद्ध पार पाडल्या. त्यामुळे सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांना पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमद रजा सोशल फाऊंडेशन चे जुनेद जिकरे, आतीक मोमीन, रहीम मोमीन, नौशाद शेख, खालीदखान पठाण, सिराज मोमीन, सोहेल शेख, फैयाज मोमीन, इम्रान पठाण, इम्रान मोमीन, समीर मोमीन इम्रान महंमद शेख, अकील मुढें, जिशान मोमीन यांनी प्रयत्न केले.