अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या भटक्या विमुक्त सेलची बैठक व्हीजेएनटी चे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत जिल्हा अध्यक्षपदी दत्तात्रेय डोकडे यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र व्हीजेएनटी चे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे समवेत निरीक्षक सिताराम काकडे, शहर कार्याध्यक्ष नामदेव पवार, मा. सरपंच अरुण ससे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब विधाते, मोहन तवले, श्रीधर तवले, विष्णू जरे, गोरख ससे, रामदास ससे, अण्णासाहेब मगर, संजय बनकर, उमेश वाघमारे, राधाकिसन तोडमल, शैलेश सदावर्ते, नवनाथ वाघ, पप्पू जरे आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्हीजेएनटीचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड म्हणाले की शरदचंद्र पवार व जयंत पाटील, सुप्रिया ताई सुळे यांच्या आदेशाने भटक्या विमुक्त जातीतील विखुरलेल्यांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाची बांधणी चालू असून तालुका जिल्हा कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे चालू असून या बांधणीसाठी नूतन भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हा अध्यक्षपदी दत्तात्रय डोकडे यांची निवड केली आहे.
भटक्या विमुक्तांना एकत्र करून पक्ष बळकटी करण्याचे काम करणार आहे व भटक्या विमुकतांना समाजात पुढे आणण्यासाठी शरदचंद्र पवार यांनी राहील त्याचा घर कसेल त्याची जमीन यांचे प्रयत्न केलेला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये नागरिक व समाज कौल दाखवून देणार असल्याचे सांगितले तर नूतन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय डोकडे म्हणाले की, पक्षाच्या वतीने जी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला तडा न जाऊ देता विखरलेल्या भटके विमुक्त समाजातील लोकांना एकत्र करून भटक्या विमुक्त समाजातल्या नागरिकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरण व सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत घेऊन जाणार असल्याची भावना व्यक्त केली व पक्ष बळकटीकरणासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले तर या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, आमदार रोहित पवार, आमदार प्राजक दादा तनपुरे, शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, युवक शहराध्यक्ष प्रकाश पोटे, प्रा. सिताराम काकडे, नामदेवराव पवार, रामदास ससे आदींनी शुभेच्छा दिले. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे...