बी.आर.चेडे - शिरसगांव
अशोक सह.सा.कारखान्याच्या वतीने २०२२ - २०२३ या गळीत हंगामात आडसाली ऊस पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतल्याबद्दल ज्ञानेश्वर( माऊली) मुरकुटे यांना अशोक सहकारी साखर कारखान्याच्यावतीने पुरस्कार दिला जाणार आहे.
चार एकर क्षेत्रात २८९ टन ऊस उत्पादन म्हणजे सरासरी एकरी ७२ टन ऊसाचे उत्पादन त्यांनी टाकळीभान येथील त्यांच्या शेतीत घेतलेले आहे.
सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी दु.२ वा. अशोक कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत त्यांना याबाबत सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे .
आपले सर्वांचे आशीर्वाद,सहकार्य आणी प्रेमामुळे मी हे शक्य करू शकलो हे मी कधीही विसरु शकणार नाही.असे ज्ञानेश्वर (माऊली) भानुदास मुरकुटे यांनी सांगितले.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

