प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :- किल्ले धारूर तालुक्यांतील गांजपूरची सुरू केलेली बस सेवा पुन्हा बंद झाली आहे.
पुर्वी धारूर -उंदरी-केज शटल बस सेवा सुरू होती.सदरील बस गांजपूर मार्गे जात होती या मुळे गांजपूरकरांची सोय होत होती. परंतू सध्या ती बस बंद असल्यामुळे गांजपूर चे जेष्ठ नागरीक,विद्यार्थी व ईतर प्रवाशी यांची गैर सोय होत आहे.
म्हणून धारूर -उंदरी-गांजपूर -केज ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी गांजपूरकरांच्या वतीने प्रा.ईश्वर मुंडे,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी,महाराष्ट्र राज्य व कस्तूरा पवार सरपंच, गांजपूर यांनी धारूर आगाराचे आगार प्रमुख नवनाथ चौरे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे
या मागणीचा सकारात्मक विचार करून बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करू असे अश्वासन आगार प्रमुख नवनाथ चौरे यांनी दिले आहे.

