औरंगाबाद प्रतिनिधी:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास बापू औताडे यांचे आदेशानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे कॉंग्रेस सेवा दलाचे वतीने ध्वजारोहण,रविमिलन कार्यक्रम संपन्न झाला.
औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे निरीक्षक तथा अहमदनगर जिल्हा काँग्रेस सेवादल मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद यांचे उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथे कॉंग्रेस सेवा दलाचे रविमिलन कार्यक्रम व ध्वजारोहण आणि मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. औरंगाबाद जिल्हा परिषद माजी सदस्य नारायण बापू मते, कॉंग्रेस ज्येष्ठ नेते जहिरभाई शेख करमाडकर, सेवादलाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव ठोंबरे,तालुका अध्यक्ष कैलास उकीर्डे, अर्जून ठोंबरे, रघुनाथ म्हस्के, सरपंच सुधीर मुळे, कृष्णा उकीर्डे, जम्मू शेख, बाबासाहेब हिवाळे, विठ्ठल कोर्डे, ज्ञानेश्वर उकीर्डे, गजानन मते, भगवान गोजे, राज ईथर, बाबासाहेब कुलकर्णी, पांडुरंग मुळे, सोमनाथ पोफळे, पठाडे सर, संतोष शेजूळ,हिंमतराव मते, रंगनाथ कुलकर्णी, आतिक शेख, साळूबा कुलकर्णी, तात्याराव मते, मोबीन सय्यद, काका ईथर, संदीप गाडेकर, योगेश घावटे, आमीन शेख, मोहिद्दीन सय्यद , बबन फोपळे, बबलू तारव आदि सह काँग्रेस सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते,
सदरील ध्वजारोहण औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नारायण बापू मते यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कॉंग्रेस सेवादलाचे निरीक्षक मास्टर सरवरअली सय्यद, कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जहीर शेख करमाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोठ्या उत्साही वातावरणात ध्वजारोहण तसेच रविमिलन चा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवादलाचे तालुका अध्यक्ष कैलास उकीर्डे यांनी केले तर करमाड चे सरपंच सुधीर मुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

