----
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
शिक्षकांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत व्हावी यासाठी दिवंगत लोकनेते बाबुरावजी आडसकर साहेबांनी केज शिक्षकांची सहकारी पतसंस्था उभारली. या संस्थेला शिक्षकांच्या साहाय्याने नावलौकिक मिवून देऊन ही संस्था आर्थिक साखम केली. मात्र, मधल्या काळात जे झाले त्याबद्दल आपल्याला बोलायचे नाही. परंतु, या संस्थेला आपण गतवैभव प्राप्त करून देऊ असा विश्वास भाजपनेते रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केला.
केज शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 24) रमेशराव आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, पतसंस्थेचे चेअरमन कल्याण काळे, व्हाईस चेअरमन बाळासाहेब अंकुशे,सचिव संजय गलांडे व सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.
रमेशराव आडसकर म्हणाले की मागील पंधरा वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना अनेक प्रकारची मदत केली. आगामी काळात देखील शिक्षक घटक केंद्रस्थानी ठेवूनच काम केले जाईल. या पतसंस्थेमुळे शिक्षकांना अर्ध्या रात्री देखील अडचणीत सुलभापने कर्ज मिळेल. तुम्ही सर्व सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थक ठरवू. पुन्हा एकदा ही संस्था नावारूपाला आणू असा विश्वास देखील रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केला.

