चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये फार्मासिस्ट डे उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधि:चेतना फाउंडेशन च्या चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात सोमवारी (ता २५) जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी हॉस्पिटल चे तज्ज्ञ डॉ. श्री एम. के. इनामदार उपस्थित राहिले, त्यांनी विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रात येणारी आव्हाने आणि जबाबदारी यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून डॉ. सौ. कल्पना खाडे मॅडम उपस्थित होत्या, त्यांनी औषधनिर्माणकर्त्याचे आरोग्य क्षेत्रात असलेले महत्व व सामाजिक जबाबदाऱ्या सांगितल्या. या कार्यक्रमास सत्यशील पाटील, धनंजय रणवरे , गणेश ठोंबरे आणि इंदापूर तालुक्यातील सर्व फार्मासिस्ट यांनीही उपस्थिती दाखवली. तसेच चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी किट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व फार्मासिस्ट ने फार्मासिस्ट दिना निमित्त शपथ घेतली व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व मान्यवर व चेतना इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या निकिता माने यांनी फार्मासिस्ट डे बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार सोमनाथ माने सर यांनी केले व फौजिया पठाण यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पूजा बनसुडे यांनी केले.