तृतीयपंथी यांचे हस्ते पूजा आरती करून शिवज्योत मित्र मंडळांनी नविन आदर्श निर्माण करून दिला-संदिप चव्हाण
इंदापूर प्रतिनिधी :- भारत हा सण आणि उत्सवांचा देश मानला जातो. भारतात मोठमोठे सण, उत्सव दरवर्षी तितक्याच उत्साहाने साजरे केले जातात. होळी, दसरा, दिपावली या सणांसह दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री असे मोठे उत्सव गाजतवजात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. असे सण, उत्सव साजरे करताना परिसराची आणि पर्यावरणाची हानी होऊ नये, तसेच त्या उत्सवाचे पावित्र्य देखील राखले जावे, म्हणून शिवज्योत मित्र मंडळ यांनी जनते समोर नविन आदर्श निर्माण करून दिला आहे, शिवज्योत प्रतिष्ठाण सरस्वती नगर येथिल अध्यक्ष-संदिप रामदास चव्हाण यांनी गणेशोत्सवात आरती साठी तृतीयपंथी यांचे हस्ते पूजा आरती संपन्न केली,सर्वां प्रमाणे तृतीय पंथीयांना पण देवाचे लेकरे समजून त्यांना वेळो वेळी सन्मान सहकार्य व मदत करा या लोकांना का बोलावू नये,समाजातील लोकांनी यांचा अपवाद वगळता मान सन्मान करण्यात यावा,आसे मत संदिप रामदास चव्हाण यांनी व्यक्त केले या गणेशमंडळाकडुन गणेशाची व मंडळाची स्थापना सन २००४ साली करण्यात आली, यासाठी लोकांकडून नवनवीन संकल्पना मांडण्यात येतात, हे मंडळ 2004 सालापासून अनेक विविध उपक्रम राबवत असते असेही चव्हाण म्हणाले या वेळी सालाबाद नुसार 2023 च्या नुसार मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य जाविर उपाध्यक्ष सागर आरगडे खजिनदार नविनकुमार गायकवाड,सह खजिनदार ,संतोष काळे,सचिव प्रितम दंडवते कार्याध्यक्ष सत्यम गडसिंग सह इतर मान्यवर उपस्थित होते,