*पंजाब नॅशनल बँकेच्या इंदापूर शाखेचे उद्घाटन*
इंदापूर प्रतिनिधि: पंजाब नॅशनल बँकेच्या इंदापूर शाखेचे उद्घाटन आज पीएनबी बँकेचे मुंबई झोनचे प्रमुख बिभु प्रसाद महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर येथे प्रामुख्याने उजनी धरणाचा पट्टा असल्याने येथे ऊस केळी व डाळिंब यासोबत इतर पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथून केळी, डाळिंब, द्राक्षे यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात येते तसेच तालुक्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात असून येथे साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तसेच शेती बरोबर इतर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय व पोल्ट्री व्यवसाय प्रामुख्याने करण्यात येतो. जवळच लोणी देवकर येथे एमआयडीसी आहे तसेच मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक व नोकरदार वर्ग आहे.त्यामुळे प्रामुख्याने पीएनबी बँकेची गरज ओळखून, पुणे मंडल प्रमुख अवधेश कुमार झा आणि शाखा प्रबंधक निशांत वानखडे यांनी प्रयत्न करून इंदापूर येथील पुणे- सोलापूर रोडवर मारुतीराव माने ट्रेड संकुल येथे शाखा अस्तित्वात आणण्यात यश मिळवले.
या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई झोनचे प्रमुख श्री बिबु प्रसाद महापात्र म्हणाले की, इंदापूर येथील शेती व्यवसाय व लहान-मोठे उद्योगधंदे व येथील औद्योगिक क्षेत्र यांची व्यापकता पाहता इंदापूर येथे पीएनबी ची शाखा असणे गरजेची बाब असल्याने ती ओळखून आम्ही या शाखेचे उद्घाटन केले. या शाखेतून जास्तीत जास्त कर्ज पुरवठा शेती व औद्योगिक क्षेत्रातील लहान मोठ्या व्यवसायिकांना करण्यात येणार आहे. तसेच ग्राहक आणि बँकेचे नाते चांगल्या प्रकारे जपण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त सोयी सुविधा पुरवण्यासाठी पीएनबी बँक कटिबद्ध असेल अशी ग्वाही यावेळी महापात्र यांनी दिली.
विशेष अतिथी म्हणून सोनाई परिवाराचे दशरथ माने यांनी मार्गदर्शन केले व बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे सुचवले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष
भरतशेठ शहा. अरविंद वाघ माजी नगराध्यक्ष इंदापूर,
धनाजी साठे चेअरमन कुरुंमदास सहकारी साखर कारखाना, अनिल पलिवाल. उपमंडल प्रमुख PNB pune,अंजना सिंह मुख्य प्रबंधक pnb पुणे, विठ्ठल माने वरिष्ठ शाखा प्रबंधक पीएनबी हडपसर, निशांत वानखडे शाखा प्रबंधक पीएनबी इंदापूर, रविंद्र शिंदे उपप्रबंधक पीएनबी इंदापूर ,योगेश भंडारेल्लू लिपिक, राकेश कुंभरकर लिपिक, संदीप माने चेअरमन मारुती माने ट्रेड सेंटर इंदापूर, संतोष फलफले, ॲड.औदुंबर ठोंबरे, राकेश फरतडे, अक्षय पिसाळ, मोरेश्वर कोकरे, प्रमोद राऊत हे उपस्थित होते.
यावेळी स्वागत व आभार शाखाधिकारी निशांत वानखडे यांनी मानले.

