shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा शालेय ज्युदो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे यशस्वीरित्या पडल्या पार

पुणे जिल्हा शालेय ज्युदो स्पर्धा  जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे यशस्वीरित्या  पडल्या पार 
इंदापूर प्रतिनिधि: पुणे जिल्हा शालेय ज्युदो स्पर्धा बारामती या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन  क्रीडा अधिकारी  शिवाजी कोळी , महेश चावले  पुणे जिल्हा पुणे ज्युदो असोसिएशन सचिव व आंतरराष्ट्रीय पंच  अनिल संकपाळ ,सौ जयश्री व्यवहारे मॅडम, सागर लाड , दत्तात्रय व्यवहारे (सर) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
 या स्पर्धेचे पंच म्हणून   सुधीर कोंडे , अतुल शेलार , वेल्सन डिसूजा यांनी काम पाहिले
तसेच स्पर्धेला सहाय्यक म्हणून  सुनील जाधव,  अल्बक्ष शेख (सर),   सागर बनसोडे,  अमोल शहाणे, अविनाश पारेकर, रुपेश भालेराव ,अनिकेत ढोकरे यांनी काम पाहिले या स्पर्धेचे आयोजन इंदापूर अम्युचर ज्युदो असोसिएशनच्या व ड्रीम डान्स अकॅडमी बारामती तालुका क्रीडा अधिकारी बारामती वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये इंदापूर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट अकॅडमीच्या व शहा हेल्थ क्लबच्या  विद्यार्थी खेळाडूंनी वर्चस्व राखले तसेच मुलांमध्ये रोहित शिंदे व मुलीमध्ये सुकन्या जाधव उत्कृष्ट खेळाडू ठरले.सर्व विजयी खेळाडूंना  महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांनी शुभेच्छा दिल्या.
close