बोराटवाडी विद्यालयात सोशल मीडियाच्या योग्य वापर करण्या संदर्भात जनजागृतीचा संदेश देत श्री गणेशाचे विसर्जन
इंदापूर प्रतिनिधि: बोराटवाडी येथील लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारत " सोशल मीडिया चा योग्य आणि अयोग्य वापर" या विषयावर पथनाट्य सादर करत श्री.गणरायाचे विसर्जन करण्यात आले .
प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावर प्रबोधनात्मक उपक्रम राबवत, जनजागृती करत श्रीगणेशोत्सव साजरा करण्याची विद्यालयाची प्रथा असल्याची माहिती प्राचार्य श्री भिमराव आवारे यांनी दिली. स्वच्छ गाव सुंदर गाव, बेटी बचाव बेटी पढाओ , वृक्षारोपण असे विषय यापूर्वी सादर केले आहेत. यावर्षी 'सोशल मीडिया' या विषयावरती जनजागृती पर पथनाट्य विद्यार्थ्यांनी सहशिक्षक श्री.अमर निलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
पारंपरिक लोप पावत चाललेल्या लेझीम या नृत्याचे सादरीकरण विद्यालयातील विद्यार्थ्यांनीनी केले. सौ.मनिषा गायकवाड व सचिन भुजबळ यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच श्री.दत्तू अण्णा सवासे, दूधगंगाचे संचालक श्री.दयानंद गायकवाड ,श्री.अजिनाथ बोराडे ,श्री.तुकाराम बर्गे, श्री.लालासो हेगडकर, श्री.राजीव भाळे, श्री.रमेश बोराडे, श्री.दत्तू रूपनवर, श्री.संतोष गायकवाड,श्री.हेमंत सुद्रिक, श्री.शहाजी हेगडकर, श्री.दीपक पवार, श्री.सुहास निंबाळकर तसेच बोराटवाडी ,चाकाटी, खोरोची, रेडणी येथील ग्रामस्थ, तरुण युवक मित्र व विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.गणेश विसर्जन रथासाठी श्री.राजेंद्र रणमोडे ,श्री.भिमराव खाडे, वैभव सोलनकर यांनी परिश्रम घेतले.सर्व शिक्षक वृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.