शेटफळ तलावाच्या पाण्याचे भाजप कार्यकर्त्यांकडून जलपूजन
• हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे तलावात पाणी
इंदापूर : प्रतिनिधी दि.27/9/23
शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे कालवा सल्लागार समितीमध्ये निर्णय होऊन शेटफळ तलावात सध्या निरा डावा कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. शेटफळ तलावामध्ये सोडण्यात आलेल्या या पाण्याचे पूजन भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.27) उत्साहात केले.
विधिवत पद्धतीने मंत्रोपचारात हे पूजन करण्यात आले. यावेळी पवनराजे घोगरे, सचिन सावंत, संतोष सुर्यवंशी, संजय शिंदे, विक्रम कोरटकर, राजेंद्र घोगरे, मुनीर आतार, धनाजी घोगरे, कैलास हागे, स्वप्निल घोगरे, गजानन शिंदे, नितीन चव्हाण, लखन नरबट, हरिभाऊ पुंडे, संदिप कानगुडे, विशाल सावंत, पंकज नवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संजय शिंदे, पवनराजे घोगरे, सचिन सावंत यांनी सांगितले की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे तलावात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा त्यांना अधिकारच नाही. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असून जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
____________________________