श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये सेंट व्हिन्सेंट
डी पॉल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक फादर शीजो, व्यवस्थापक् फादर थॉमस, उपमुख्याध्यापिका सिस्टर दिप्ती,फादर मायकल वाघमारे, फादर संजय पठारे,साळवे सर आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत बँड पथकाद्वारे करण्यात आले तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.
इयत्ता सहावी च्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. फादर थॉमस यांनी सेंट विन्सेंट डी पॉल यांच्या विषयी मुलांना माहिती दिली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने फादर थॉमस आणी फादर शिजो यांचा पुष्गुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईयत्ता
सहावीचे विद्यार्थी आरव, आर्यन, सॉम्या,आणि सारा यांनी केले.सदर कार्यक्रमचे नियोजन वर्गशिक्षिका सिस्टर लिटी, कोरिओ ग्राफर रोहित पवार सर,सोनम वधवा ,आशिष सर ,पवार सर, स्मिता कांबळे टीचर,गौतम सर यांनी केले.
सहयोगी:
पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111