shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचेकडे बावडा येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा

हर्षवर्धन पाटील यांचेकडे बावडा येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा 

फोटो:-बावडा येथे बैलपोळा सणानिमित्त गाई व बैल जोडीचे पूजन व मंगलाष्टका विधी प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर : प्रतिनिधी दि. 14/10/23
              बावडा येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेकडे परंपरेनुसार बैलपोळा सण हा खिलार बैलजोडीचे व गाईचे पूजन करून  शनिवारी (दि.14) उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा हा उत्सव असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
          यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते बैल पोळा निमित्त गणपती पूजन, आळंद पूजन, ऋषभ देवता पूजन, गोमुख पूजन, चावड पूजन करण्यात आले. तसेच गाई व बैलाच्या लग्न सोहळ्यानिमित्त याप्रसंगी मंगलाष्टका होऊन गाई-बैलांना नैवेद्य खाऊ घालण्यात आला. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, राजेंद्र कोरटकर, नवनाथ घोगरे आदी उपस्थित होते. विधीचे पौरहित्य राजमणी कुलकर्णी यांनी केले.
 ______________________________

close