shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निंबोडी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा* *आमदार दत्तात्रय भरणे यांनी आंतरपाट धरून लावले लग्न*

*निंबोडी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा* 
 *आमदार दत्तात्रय भरणे यांनी आंतरपाट धरून लावले लग्न* 
 इंदापूर प्रतिनिधि:निंबोडी ता.इंदापूर येथे आज भाद्रपदी बैलपोळा सणानिमित्त निमित्त उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितले कि,शेतकरी बांधवांचा सर्वात जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा सण असून स्वतःच्या कुटूंबातल्या सदस्याप्रमाणे शेतकरी गाई-बैलांना जीव लावत असतो.तसेच मालकाच्या शेतात दिवस-रात्र काबाड कष्ट करून कुटूंबाला आधार देण्याचे काम जनावरे करत असतात.त्यांच्या याच मेहनतीची ऊतराई म्हणून शेतकरी वर्ग मोठ्या आनंदाने बैलपोळा सण साजरा करून कृतज्ञता व्यक्त करत असतो.त्यामुळे आपल्या ग्रामीण जिवन संस्कृतीमध्ये या सणाचे अनन्य साधारण महत्व असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली.तसेच या निमित्त गावकऱ्यांच्या साक्षीने गायी-बैलाचा विवाह सोहळा मोठ्या थाटामटात पार पडला.यामध्ये आमदार भरणे यांनी आंतरपाट धरून विवाहाची मुख्य भुमिका पार पाडल्याने त्यांची हि कृती गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वांना बैलपोळा निमित्त शुभेच्छा आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिल्या तसेच भाद्रपदी बैलपोळा निमित्त गाय आणि बैल जोडीचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ,हनुमंत घोळवे,प्रवीण घोळवे,विठ्ठल घोळवे यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close