प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी तंत्रज्ञान व्यस्थापण यंत्रणा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समिती केज येथे मंगळवार दि:17/10/23 रोजी शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात डॉ.व्ही.पी.सूर्यवंशी (कृषी विद्यावेत्ता) रब्बी पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करनार आहेत, तर डॉ. सी. डी. बंटेवाड(Entemologist) प्राचार्य शासकीय कृषी महाविद्यालय ,अंबाजोगाई हे कीड व रोग नियंत्रण या विषयावर तर श्री. सुनील वराट(जिल्हा रेशीम विकास अधिकारी) हे रेशीम उद्योग व शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आ.नमिताताई मुंदडा, उद्घाटक म्हणून भाजपा जेष्ट नेते रमेशराव आडसकर,तर प्रमुख पाहुणे म्हणून येडेश्वरी शुगर चे चेअरमन श्री बजरंग बप्पा सोनवणे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक श्री. सुभाष साळवे हे उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. अंकुशराव इंगळे, उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर व कृषी अधिकारी श्री सागर पठाडे यांनी केले आहे.
दि:17/10/2023
ठिकाण: कृषि उत्पन्न बाजार समिती, केज
वेळ:11:00 वाजता


