shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्व- एक कुटंब ' हि संकल्पना वर्ल्ड पार्लमेंट खऱ्या अर्थाने राबवते - प्राचार्या सुवर्णा बोडके

'
श्रीरामपूर -
           वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लममेंट असोशिएशन अर्थात जागतिक संविधा व संसद संघ (डब्ल्यूसीपीए) यांच्या वतीने वसुधैव कुटुंबकम या तत्त्वानुसार शिक्षक दिना निमित्त समाजाचे शिल्पकार शिक्षक व प्राध्यापक यांच्यासाठी एक सन्मान योजना राबविण्यात आली होती. तसेच सामाजिक उपक्रमातंर्गत लोकहितार्थ कार्य करणाऱ्या काही व्यक्तींचा व संस्थाचा सन्मान करण्यात करण्यात आला. याप्रसंगी वर्ल्ड पार्लमेंटच्या वरिष्ठ अधिकारी प्राचार्या सुवर्णा बोडके यांनी श्रीरामपूर येथील व्हिआयपी गेस्ट हाऊस सभागृतील एका खास समारंभात अध्यक्षपदावरून बोलताना विश्व- एक कुटंब ' हि संकल्पना वर्ल्ड पार्लमेंट खऱ्या अर्थाने राबवते व सामाजिक दरी दूर करण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

             याच कार्यक्रमात हांगझोऊ (चिन) येथे झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरूष कबड्डी संघातील खेळाडू अस्लम मुस्तफा इनामदार यांचा विशेष सन्मान पत्र व सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमच्या सुरुवातीलाच अस्लम इनामदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अस्लम इनामदार, सुवर्णा बोडके व हॅपी मेडिकेअर सेंटर श्रीरामपूर यांना वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टिन यांना 
" विश्वस्नेही " या विशेष सन्मानाची घोषणाही केली आहे .
               त्याचबरोबर वर्ल्ड पार्लमेंट बेस्ट शिक्षक - प्रोफेसर अवॉर्ड २०२३ मेजर.  डॉ. सुषमा सुखदेव कदम/ओहोळ,संगमनेर, अहमदनगर, NCC अधिकारी, शिक्षण, सामाजिक कार्य.  सौ. मोहम्मदी जाकीर काझी, पुणे,शिक्षण. सौ.पुष्पा पंडित सपकाळे, जळगाव,अध्यापन आणि समाजकल्याण. श्रीमती. शेजवाल कल्पना एकनाथ, नाशिक, शिक्षण आणि अध्यापन. डॉ. उत्तम तुकाराम गायकवाड, लातूर, शिक्षण आणि अध्यापन. सौ. नेहा दीपक कुलकर्णी, नाशिक, अध्यापन आणि शिक्षण. श्री.बबन पाराजी लांडगे, राहुरी, शिक्षण आणि क्रीडा. डॉ.सुनील अण्णासाहेब खांडेभराड, घनसावंगी, जालना, शिक्षण, पर्यावरण. श्री.कुणाल दादासाहेब काळे.शिक्षण, इंदापूर, पुणे -उत्कृष्ठ संस्थेसाठी
[ प्रोफेसर कुणाल काळे 'ज विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी- स्कुल ऑफ फौंडेशन इंदापूर ].श्री शिवाजी भागुजी शिरसाट,  प्रिन्सिपल, ज्योती माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव-नाशिक यांना देऊन सन्मानीत करण्यात आले.
              तसेच वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड२०२ सौ.अंजली बाळकृष्ण कुलकर्णी, पुणे,अध्यात्म विज्ञानासह सामाजिक कार्य. डॉ.कविता प्रमोद कांबळे
सोलापूर, डॉक्टर/वैद्यकीय सेवा/सामाजिक कार्य. आणि अपर्णा हरदास हॅपी मेडिकेअर थेरपी सेंटर, श्रीरामपूर यांना प्रदान करण्यात आला.
               सदर कार्यक्रमा प्रसंगी जेष्ठ चित्रकार भरतकुमार उदावंत, धुळे पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल पाटील, दै.माझा मराठवाडा ( औरंगाबाद ) चे संपादक दशरथ सुरोडकर, वरिष्ठ वकील व कायदेशीर सल्लागार शहानूर सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डब्ल्यूसीपीएच्या सर्व स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले.
            डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी उपस्थित व पुरस्कार्थींचे स्वागत करताना राबवत असलेल्या उपक्रमांची व भविष्यातील योजनांची माहिती आपल्या प्रास्तविकात दिली. या प्रसंगी प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीचा प्रस्ताव सर्वमान्य व्हावा या उद्देशाने श्रीरामपूरातील व्यापारी मनजितसिंग बतरा यांनी प्रायोजित केलेल्या कापडी पिशव्यांचे अनावरण करण्यात आले.
            स्त्रीरोगतज्ञ डॉ. कविता कांबळे यांनी महिलांना भेडसावणाऱ्या कॅन्सर विषयी मार्गदर्शन केले तर हॅप्पी मेडिकर सेंटरच्या अपर्णा हरदास यांनी जर्मेनिक थेरपीच्या मोफत उपचारा संदर्भात उपस्थिनांना माहिती दिली. याच बरोबर डॉ. उत्तम कांबळे, पुष्पा सपकाळे, अंजली कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
             डब्ल्यूसीपीएचे खजिनदार सीके भोसले, सहसचिव ऋषिकेश विघावे, कार्यकारीणी सदस्या आश्विनी धुमाळ, मनोज थोरात यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाचे योगदान दिले. तर आकाशवाणीचे नैमित्तिक उदघोषक प्रसन्न कुमार धुमाळ यांनी सुमधुर वाणीने सुत्रसंचलन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
close