बेलापूर प्रतिनिधी:
आपला सात्विक आहार हाच आपल्या सुदृढ शरीराचे औषध आहे. भगवद्गीतेतील उपदेशानुसार सात्विक आहार घेतला तर सर्वांचे जीवन सुखकारक होईल असे उद्गार कोल्हार येथील डॉ.शशिकांत काळे यांनी काढले.राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी मंचच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, फळांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्यास घातक औषधांपासून आपण दूर राहू शकतो. आयुर्वेद ही भारताने संपूर्ण मानव जातीला दिलेली देणगी आहे. आपण सात्विक आहार घेणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले.यावेळी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, सहसचिव दिपक सिकची, विश्वस्त चंद्रशेखर डावरे ,संजय राठी आदि मान्यवर उपस्थित होते.डॉ. मृणालिनी काळे यांनी धन्वंतरीची प्रार्थना म्हंटली.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य गुंफा कोकाटे म्हणाले की, भरपूर पाणी प्या, भरपूर व्यायाम करा, भरपूर चाला, प्रथिने कार्बोहायड्रेट युक्त पदार्थांचा जेवणात जास्त वापर करा, काळजी करणे सोडा, धन्वंतरीच्या प्रतिमापुजनाने व प्रार्थनेने चर्चासत्राला सुरुवात झाली.
अश्विनी टाकसाळ हिने सूत्रसंचालन केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी आभार मानले. चर्चासत्र समन्वयक म्हणून प्रा.रुपाली उंडे यांनी कामकाज पाहिले तर अशोक थोरात,ओंकार मुळे यांसह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वृंद यांनी चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

