इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमेशनचे
माजी सैनिकांच्या हस्ते शुभारंभ
श्रीरामपूर प्रतिनिधी:
मुंबई, पुणे, नाशिक सारख्या मोठ मोठ्या शहरांमध्ये मॅजिक इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमेशनचे कोर्स चालतात व त्याचे महत्त्व आज मितीला देशात जास्त प्रमाणात दिसून येते आणि या कोर्सेस साठी एवढ्या मोठ्या शहरांमधे राहण्याचा व फी चा खर्च पालकांना पेलावत नसल्याने बाहेर गावी मुलं व मुलींना पालक पाठवण्यास धजावत नसल्याने आपल्या कडे त्याचं जास्त महत्त्व वाटत नाही परंतु आजच युग हे डिजीटलायजेशन व अनिमेशनचेच युग आहे आणि त्याच अनुषंगाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आपल्या शहरांमध्ये इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वा प्रतापसिंग राठोड यांच्या माध्यमातून इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आले आहे त्याचा शुभारंभ श्रीरामपूर तालुक्यातील त्रिदल सैनिक सेवा संघाच्या सर्व माजी सैनिकांचे प्रवेश द्वाराजवळ आगमन होताच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले सर्व सैनिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला , याप्रसंगी त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांनी शुभेच्छा देतांना म्हणाले की, आपल्या शहरात हे इन्स्टिट्यूट सुरू झाले असुन याचा फायदा सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांना द्यायला हवा व या कोर्स साठी माजी सैनिकांनी आपले मुलं/मुलीं/ नातवंडे यांना पाठवावे व संस्थेने फी मध्ये सैनिकांच्या पाल्यांना सुट द्यावी,तसेच स्त्री शक्तीच्या अध्यक्षा सौ. दिपाली ससाणे म्हणाल्या की संपूर्ण जग हळूहळू डिजिटायलेशन व अनिमेशनच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि त्याची आता प्रत्येक क्षेत्रात गरज भासत आहे,
अनिमेशनच्या नाशिक विभागाच्या प्रमुख सौ,निशा भिरूड म्हणाल्या की या अनिमेशनच्या कोर्सेस मध्ये अनेक फायदे आहेत आणि कन्सेक्शन आहेत जसे कमवा व शिका सिंगल पेरेंट्सला ५० % सुट आहे व या इन्स्टिट्यूटचा शुभारंभ माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आला याचा मला फार मोठा आनंद आहे, माजी सैनिक बाळासाहेब बनकर म्हणाले की इन्स्टिट्यूट ने आम्हा सैनिकांना निमंत्रित करून सर्वाचा यथोचित सन्मान केला त्याबद्दल त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले, या श्रीरामपूर इन्स्टिट्यूट चे प्रमुख प्रतापसिंह राठोड म्हणाले की माझ्या परिवारा मध्ये आजोबा पासून ते वडिलां पर्यंत स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिक आहेत आणि आज मी आपल्या सर्व सैनिकांच्या माध्यमातून माझे आजोबा व वडिलांना बघत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष माजी नायब तहसीलदार उत्तमराव दाभाडे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सनी जमधडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु ,शुभांगी ब्राम्हणे यांनी केले या कार्यक्रमासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार, संग्रामजीत यादव,बाळासाहेब बनकर, उत्तमराव दाभाडे, आर ,टी ,कांदे रामदास वाणी, विलास खर्डे, सुनील गवळी , भगीरथ पवार, रवींद्र कुलकर्णी असलम शेख ,कृष्णा नवले, चांगदेव धाकतोडे, दिलीप तांबे, सुनील भालेराव ,कैलास कोठुळे इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

