shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शब्दगंध संमेलनाचे नियोजन महत्त्वाच्या टप्प्यावर : कवी प्रकाश घोडके


अहमदनगर प्रतिनिधी:
परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये साहित्याला खूप महत्त्व असून साहित्यिकच समाजात परिवर्तन करू शकतो, त्यासाठी शब्दगंध सारख्या साहित्य संमेलनाची आवश्यकता असून शब्दगंध परिषदेचे पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चालू असलेले नियोजन अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट गीतकार,कवी प्रकाश घोडके यांनी व्यक्त केले.


        कोहिनूर मंगल कार्यालय, अहमदनगर येथे शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक प्राचार्य जी.पी.ढाकणे, संस्थापक सुनील गोसावी, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौभे,पाथर्डी चे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे,कार्याध्यक्ष  डॉ.अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     पुढे बोलताना ते म्हणाले की शब्दगंधाची आजवरची सर्व साहित्य संमेलन यशस्वी झालेले असून नवोदित साहित्यिकांचा व मान्यवरांचा यथायोग्य मान सन्मान करून साहित्य सेवा करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्याला भूषणावह असे काम शब्दगंध कडून होत आहे.
यावेळी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. हिंद सेवा मंडळ व अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व शेवगाव येथील कृषी भूषण बापूसाहेब भोसले यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक,साहित्यिक, व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल चर्चा करण्यात आली. गंगाधर शास्त्री पुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनातील साहित्यिकांची मुक्कामाची व्यवस्था कोहिनूर मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी संमेलनाला उपस्थित रहावे यासाठी परिषदेचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहेत.
या बैठकीत जयश्री झरेकर, भारत गाडेकर, चंद्रकांत पालवे, प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी केलेल्या सूचनेनुसार नियोजन करण्यात आले आहे.
    बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना अध्यक्ष राजेंद्र उदागे म्हणाले की,आमदार संग्रामभैया जगताप यांच्या स्वागताध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्ते संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असून जास्तीत जास्त साहित्यिक व साहित्य रसिकांनी या संमेलनाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

यावेळी संपत नलावडे, डॉ. रमेश वाघमारे,शाहीर अरुण आहेर, सुभाष सोनवणे, बबनराव गिरी,बी. के.राऊत, आनंदा साळवे, रज्जाक शेख ,मारुती सावंत, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, सरोज अल्हाट शर्मिला गोसावी आरती गिरी, शर्मिला रणधीर, प्रा डॉ अनिल गर्जे,सुरेखा घोलप,स्वाती अहिरे, शामा मंडलिक यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रस्ताविक भगवान राऊत यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले.

*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close